शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना समोसे विकाल तर दोन लाखांचा दंड अन् जेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 14:41 IST

विना परवानगी फूडची दुकाने चालविणाऱ्यांना दोन लाखांपर्यंत दंड व सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो.

पिंपरी : अन्नपदार्थ विक्रेत्यांना किंवा उत्पादकांना अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत परवाना, नोंदणी घेऊनच व्यवसाय करणे बंधनकारक आहे. ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना अन्न आणि औषध प्रशासनाकडून परवाना दिला जातो. तर ज्यांची वार्षिक उलाढाल १२ लाखांच्या आत आहे, त्यांची नोंदणी केली जाते. पुणे जिल्ह्यात या वर्षी आतापर्यंत २५ हजार ९६० अन्न व्यावसायिकांनी फूड परवाना घेतला आहे. तर १ लाख २७ हजार ७८ अन्न व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे.फूड लायसन्स काढण्याचा खर्च किती ?१२ लाखांपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांच्या नोंदणीसाठी फक्त १०० रुपये खर्च येतो. तर १२ लाखांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या अन्नविक्रेत्यांना २ हजार तर उत्पादकांना ३ ते ५ हजार रुपयांत फूड परवाना दिला जातो.विनापरवाना व्यवसाय केल्यास दंड किती ?नोंदणी केल्याशिवाय कुणालाही दुकान सुरू करता येत नाही. जे अन्न व्यावसायिक विनापरवाना, विना नोंदणी अन्न व्यवसाय करताना आढळून येतील, त्यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत न्यायालयात खटला दाखल करण्याची तरतूद आहे. जे दुकानदार खराब पदार्थ ग्राहकांना विक्री करतात. त्यांची दुकाने सील करण्याची कारवाई केली जाते. विना परवानगी फूडची दुकाने चालविणाऱ्यांना दोन लाखांपर्यंत दंड व सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो.अर्ज कसा करायचा ?अन्न व्यावसायिक किंवा अन्नपदार्थ उत्पादन करणाऱ्या व्यावसायिकांनी नोंदणीसाठी किंवा परवाना घेण्यासाठी एफएसएसएएआय डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. ग्राहकांनी काय काळजी घ्यावी ?प्रत्येक खाद्यपदार्थांच्या वेस्टनावर ‘बेस्ट बिफोर’ तपासूनच ग्राहकांनी तपासणी करूनच खरेदी करावे. बेस्ट बिफोर लिहिले नसेल तर यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाला तक्रार करता येईल.

अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुकानांची नियमित तपासणी करून भेसळयुक्त, कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. तसेच मुदत संपलेल्या अन्नपदार्थांची विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई किंवा गंभीर प्रकरणांमध्ये दुकान बंद केले जाते. - सुरेश अन्नपुरे - सहआयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेrailwayरेल्वेfoodअन्नMuncipal Corporationनगर पालिकाmedicineऔषधंHealthआरोग्य