शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

पालकांच्या विसंवादामुळे शालेय विद्यार्थ्यांचे पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 03:18 IST

कुटुंबात आईवडिलांचे वाद; शहरात वाढल्या घरातून पळून जाण्याच्या घटना

- प्रकाश गायकर पिंपरी : कुटुंबात आईवडिलांचे एकमेकांशी प्रेमाचे व सलोख्याचे संबंध नसल्याने मुलांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. शालेय वयातील विद्यार्थी वेगळ्या मार्गावर जात असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. आईवडिलांना मुलांसाठी वेळ नसणे, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते नाही. मुले आणि पालकांमधील संवाद हरवत चालला आहे. घरात प्रेमळ व सकारात्मक वातावरण नसल्याने मुले भरकटताना दिसत आहेत. त्यातून नशेच्या आहारी व मौजमस्ती करण्यात अल्पवयीन मुले दंग होतात. घरात आई-बाबा एखादा शब्द बोलले तरी ही मुले टोकाचा निर्णय घेऊन घराबाहेर पडतात. उद्योगनगरीत मुले व मुली घरातून न सांगता पलायन करण्याच्या घटना वाढत आहेत. अलीकडच्या काळात आईवडील दोघांना कामासाठी घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे कुटुंबात मुलांना देण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे अल्पवयीन मुलांचे योग्य संगोपनाकडे दुर्लक्ष होते.त्यातून ईर्ष्या, द्वेष वाढत जातात. एखादी गोष्ट त्याच्याकडे आहे मग माझ्याकडे का नाही, असे प्रश्न मुलांना वेगळ्या मार्गावर घेऊन जात आहेत. त्यातून मग आईवडिलांसोबत छोट्या-छोट्या गोष्टींसाठी भांडणे करतात. कोणी समजून घेण्यासाठी नसल्याने एकलकोंडी होतात.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही मुले सराईतपणे करीत आहेत. स्मार्ट फोनमधील विविध अ‍ॅप्समुळे सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. मात्र आता हा स्मार्ट फोनच पालकांच्या चिंतेत भर टाकत आहे.कोवळ्या वयात पडतात प्रेमातशाळा, महाविद्यालयात झालेली ओळख स्मार्ट फोनमुळे अधिक घट्ट होते. लेटनाईट चॅटिंग करणे, विविध पोझमधील फोटो अपलोड करणे, मिनिटाला स्टेटस बदलणे हे मुलांना नवीन नाही. घरात मुलांना सकारात्मक प्रेम मिळत नाही. त्यामुळे कोवळ्या वयात मुले-मुली एकमेकांमध्ये जास्त जवळीक साधून प्रेमात पडतात. प्रपोज करणे, ब्रेक अप होणे हे शब्द शाळा, महाविद्यालयाच्या आवारात नित्याने ऐकायला मिळतात. विशिष्ट वयात प्रेमात पडल्यावर पालकही विरोध करणार नाहीत, मात्र कोवळ्या वयात प्रेमात पडलेल्या मुलांना पाहून घरचेही धास्तावले आहेत.आई-बाबांनाच धरतात वेठीसमुलांच्या मनासारखे झाले नाही तर मुले आई-बाबांनाच वेठीस धरतात. गेल्या आठवड्यात तीन शाळकरी मुली शाळेत जातो असे सांगून घराबाहेर पडल्या. मात्र रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. तेव्हा घरच्यांनी पोलिसांत तक्रार दिली आणि त्यानंतर पोलीस व पालकांची शोधाशोध सुरू झाली. मुंबईला जाण्याच्या तयारीत असताना या मुलींना लोणावळा स्थानकातून ताब्यात घेण्यात आले. केवळ सहल म्हणून त्या घराबाहेर पडल्या असल्याचे त्यांनी सांगितले.सुसंवादाची योग्य वेळ जाणावीआपले पाल्य अबोल होणे, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, फोनवर सतत रमलेले असल्यास, अनेक भेटवस्तू घरात दिसू लागल्यास, वारंवार शाळा कॉलेज बुडवत असल्यास, सिनेमा हॉटेल येथील फेऱ्या वाढल्या असतील. तसेच चेहºयावर अतिभीती अथवा आनंद दिसू लागला असेल, मित्र परिवारातील एखाद्या मुलाकडे ऐपतीपेक्षा महागड्या गाड्या, कपडे, फोन दिसत असल्यास आपल्या लेकीला विश्वासात घेऊन अत्यंत मायेने तिच्याशी या विषयी संवाद सुरू करायला हवा.घरामध्ये एकेरी संवाद नको. संवाद दोन्ही बाजूने असला तरच अपेक्षित आशय एकमेकांपर्यंत पोहोचतो. मुलांना खूप काही सांगायचे असते. परंतु त्यांना ही संधी दिली नाही तर ओघाने त्यांचे ऐकणारे त्यांना प्रिय वाटू लागतात. काही विषय वर्ज्य असले तरीही आपल्या पाल्यासोबत निसंकोचपणे चर्चा करावी. प्रेम भावनेचा आधारे जर समाजकंटक ठरवून, सूड भावनेने मुलींना प्रेमाचे जाळ्यात अडकवत असतील, तर पालकांनी गांभीर्याने विचार करावा. - स्मिता कुलकर्णी, समुपदेशक

टॅग्स :relationshipरिलेशनशिपpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड