Sandeep Bishnoi accepted new Commissioner of Police charge | नवे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी स्वीकारला पदभार
नवे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी स्वीकारला पदभार

पिंपरी : पिंपरी -चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आज (दि. २१) पदभार स्वीकारला. शहराचे पहिले पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची शुक्रवारी (दि. २०) बदली. त्यानंतर आयुक्तपदी बिष्णोई यांची वर्णी लागली. 

पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच औद्योगिक पट्ट्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार गेल्या वर्षी शासनाकडून त्यास मंजुरी मिळून १५ आॅगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. पहिले पोलीस आयुक्त म्हणून पद्मनाभन यांची वर्णी लागली.

राज्य शासनाच्या गृह विभागातर्फे काढण्यात आलेल्या आदेशानुसार पद्मनाभन यांची बदली झाली आहे. मुंबई येथील वैधमापनशास्त्र विभागाचे नियंत्रक संदीप बिष्णोई यांची पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.


Web Title: Sandeep Bishnoi accepted new Commissioner of Police charge
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.