पाथरगाव खिंडीत वाळूचा ट्रक पलटी,एक तास वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 20:28 IST2020-02-12T20:27:43+5:302020-02-12T20:28:51+5:30
पुणे मुंबई महामार्गावर पाथरगाव खिंडीत गावातील रस्त्यावरून रिव्हर्सने आलेला एक वाळूने ( क्रसेंट ) भरलेला ट्रक महामार्गावर येवून पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र एक तास वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

पाथरगाव खिंडीत वाळूचा ट्रक पलटी,एक तास वाहतूक कोंडी
कामशेत : पुणे मुंबई महामार्गावर पाथरगाव खिंडीत गावातील रस्त्यावरून रिव्हर्सने आलेला एक वाळूने ( क्रसेंट ) भरलेला ट्रक महामार्गावर येवून पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र एक तास वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार (दि.१२) रोजी सव्वा अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कामशेत हद्दीतील महामार्गाच्या जवळ पाथरगावाकडे वाळूने भरलेला ट्रक (क्र. एम एच १२ सी टी ८०४३) हा चढावरून गावाच्या दिशेने जात जात होता. तो चढ चढू शकला नसल्याने ट्रक ड्रायव्हरला वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे ट्रक उताराने मागे येऊन गावाच्या रस्त्यावरून थेट पाथरगाव खिंडीमध्ये पुणे मुंबई लेन महामार्गावर पलटी झाला. यावेळी ट्रक चालकाने ट्रक मधून वेळीच उडी मारल्याने तो बचावला आहे.
सुदैवाने यावेळी महामार्गावर एकही वाहन नसल्याने मोठा अपघात घडला असता. काही दिवसांपूर्वीच तळेगाव लिंबफाटा येथे एक हायवा दुचाकीवर पलटी होवून एका तरुणाचा हकनाक बळी तर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. याच घटनेची पाथरगाव खिंडीत पुनरावृत्ती झाली असती. मात्र सुदैवाने महामार्गावर ट्रक पलटी होत असताना एकही वाहन नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
अपघातग्रस्त वाहनामुळे पुणे मुंबई लेनवर सुमारे एक तास बंद होती. महामार्गावर वाळूचा ढिग पसरून ट्रक उलटा पडला होता. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. कामशेत पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरु करून आयआरबी कर्मचारी व क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. तसेच अपघातग्रस्त ट्रकचे रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवर क्रसेंट टाकून साफ करून साडे बारा वाजण्याच्या सुमारास महामार्गाची लेन वाहतुकीस खुली केली.