Sahil Syyed of Dapodi in the wheelchair 20-20 cricket team | व्हीलचेअर २०-२० क्रिकेट संघात दापोडीच्या साहिल सय्यदची निवड 
व्हीलचेअर २०-२० क्रिकेट संघात दापोडीच्या साहिल सय्यदची निवड 

पिंपळे गुरव : भारत व बांग्लादेशमध्ये येत्या २८ ते ३१ मार्च दरम्यान इंटरनॅशनल व्हीलचेअर क्रिकेट सिरीज ही ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट सामन्यांची मालिका होत आहे. ही मालिका मुंबई आणि गोवा येथे होत असून, या मालिकेसाठी दापोडीतील साहिल सय्यद या ९० टक्के अपंगत्व असलेल्या तरुणाची इंडियन व्हीलचेअर क्रिकेट संघात निवड झाली आहे. 
    नव्वद टक्के अपंगत्व असतानाही त्यावर मात करीत दापोडीतील या २२ वर्षीय तरुणाने अ‍ॅथलेटिक, पॉवरलिफ्टिंग आणि क्रिकेट खेळामध्ये चमक दाखविली आहे. या तिन्ही क्रीडाप्रकारात साहिलने गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, मॅन ऑफ द मॅच असा बहुमान मिळवला आहे. सध्या तो महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळत आहे. केवळ जिद्द आणि दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर साहिल मार्गक्रमण करीत आहे. साहिलच्या या निवडीचे स्वागत होत आहे. मुंबई आणि गोव्यात पार पडत असलेल्या या मालिकेसाठी साहिल मुंबईला रवाना झाला असून, दोन दिवस त्यांचे तेथे सराव सामने आहेत. 
             साहिल सर्वसामान्य मुलांप्रमाणे नसला, तरी या मुलांप्रमाणे त्याच्या आवडीनिवडी, महत्त्वाकांक्षा आहेत. लहानपणापासूनच त्याला खेळाची आवड आहे. विशेषत: क्रिकेटची आवड परंतु, तो क्रिकेट कसा खेळू शकेल ? असा त्यांना प्रश्न पडत असे. साहिल मित्रांना जमवून चांगले क्रिकेट खेळू लागला. वडिलांनी त्याला हवे ते खेळाचे साहित्य घेऊन दिले. दहा वषार्चा असताना क्रिकेट चांगला खेळू लागला. साहिलचे वडील सलीम दादाभाई सय्यद हे भारतीय सैन्यदलात होते. साहिलची आई शबनम यांचेही साहिलच्या यशात मोलाचे योगदान आहे. साहिलने जिल्हास्तरीय क्रिकेटमध्ये त्याने आपली चमक दाखविली. त्याची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली. मेरठ येथे पार पडलेल्या इंडियन व्हिलचेअर क्रिकेट लीग स्पर्धेत महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश यांच्यात झालेल्या सामन्यात साहिलला मॅन आॅफ द मॅचचा बहुमान मिळाला होता. बांग्लादेश क्रिकेट दौºयासाठीही साहिलची संघात निवड झाली होती. मात्र, वैयक्तिक कारणामुळे त्याला या दौºयाला जाता आले नाही. केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर साहिलची घोडदौड सुरु आहे. साहिलला क्रिकेटबरोबरच अ‍ॅथलेटिक (गोळा फेक), पॉवरलिफ्टिंग खेळाची आवड असून, यामध्येही त्याने नैपुण्य मिळविले आहे. अ‍ॅथलेटिकमध्ये त्याने सुवर्णपदक, पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळविले आहे.


Web Title: Sahil Syyed of Dapodi in the wheelchair 20-20 cricket team
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.