लोणावळाजवळील दुधिवरे खिंडमध्ये दरड कोसळली : वाहतुकीस अडथळा, पर्यटकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 16:40 IST2018-06-23T16:37:55+5:302018-06-23T16:40:51+5:30
लोणावळा रस्त्यावर असलेल्या दुधिवरे खिंड येथे दरड कोसळून वाहतुकीची कोंडी झाली आहे. कालपासुन रात्रभर पाऊस सुरू असल्याने खिंडीतील दगड निसटून दरड खाली कोसळली आहे.

लोणावळाजवळील दुधिवरे खिंडमध्ये दरड कोसळली : वाहतुकीस अडथळा, पर्यटकांची गैरसोय
पवनानगर (मावळ, जि. पुणे) : लोणावळा रस्त्यावर असलेल्या दुधिवरे खिंड येथे दरड कोसळून वाहतुकीची कोंडी झाली आहे. कालपासुन रात्रभर पाऊस सुरू असल्याने खिंडीतील दगड निसटून दरड खाली कोसळली आहे.
पवनानगर मावळ परिसरात सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी वाहतुक कोंडी झाली आहे. याच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिकांची ये-जा चालू असते. सकाळपासून दरड हटवण्यासाठी बांधकाम विभागाचे एकही अधिकारी न आल्याने पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पर्यटक हतबल झाले आहेत.