शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

नपुंसकत्वाचा धोका तारुण्याच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: May 31, 2017 02:36 IST

तरुणांमध्येही तंबाखूच्या व्यसनाचे प्रमाण वाढले असून त्यामुळे लैैंगिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय

प्रज्ञा केळकर-सिंग/ लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : तरुणांमध्येही तंबाखूच्या व्यसनाचे प्रमाण वाढले असून त्यामुळे लैैंगिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवला आहे. तंबाखूच्या सततच्या सेवनामुळे नपुंसकत्व तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. व्यसनांध तरुणांमध्ये नपुंसकत्वाचे प्रमाण ५०-६० टक्क्यांच्यादरम्यान वाढले आहे.तंबाखूच्या सेवनामुळे दररोज १० हजार लोक मृत्यूच्या दाढेत ढकलले जातात. तंबाखूमुळे तोंडाचा, फुफ्फुस, जीभ, अन्ननलिकेचा कर्करोग उद्भवतो. पूर्वी हा कर्करोग वयाच्या चाळिशीनंतर डोकावू लागायचा. आता, कर्करोगतज्ज्ञांकडे येणाऱ्या तरुणांची वयोमर्यादा तिशीपर्यंत खाली आली आहे. कर्करोगाप्रमाणेच तंबाखूच्या सेवनामुळे लैैंगिक समस्याही मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. त्यामुळे वंध्यत्व तसेच नपुंसकत्वाच्या समस्येलाही सामोरे जावे लागू शकते, असे निरीक्षण डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, ‘बऱ्याच तरुणांना दररोज तंबाखूच्या ८-१० पुड्या खाण्याची सवय असते. असे बरेचसे रुग्ण नियमितपणे उपचारांसाठी येतात. या तरुणांमध्ये लैैंगिक समस्या मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र, आपल्याकडे पुरुष अजूनही लैैंगिक समस्यांबाबत मोकळेपणाने बोलत नाहीत. डॉक्टरांचा वेळीच सल्ला न घेतल्यास या समस्या दीर्घकालीन रुप धारण करू शकतात.’ तंबाखूच्या सेवनामुळे रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम होतो. रक्तवाहिन्यांचा आकार कमी झाल्याने रक्तप्रवाहावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे रक्तदाबही मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यातून उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका संभवतो. तंबाखूमध्ये निकोटिन, अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन, नायट्रासॅमीन आदी रसायने असतात. तंबाखूसेवनाने रासायनिक प्रक्रिया होत असल्याने त्याचा शरीरावर थेट विपरित परिणाम होतो. व्यसनाचा परिणाम थेट रक्तवाहिन्यांवर होत असल्याने लैैंगिक समस्या निर्माण होतात. अशा वेळी, समुपदेशन, सेक्सथेरपी, औैषधोपचार या माध्यमातून लैैंगिक समस्यांवर उपचार करण्याबरोबरच डॉक्टरांकडून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न केले जातात.तंबाखूमध्ये निकोटिनचा समावेश असल्याने त्याचा परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो. रक्तवाहिन्या लहान झाल्याने रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार उद्भवतात. यामध्ये लैैंगिक समस्यांचाही समावेश असतो. तंबाखूच्या सेवनामुळे लिंग ताठ न होण्याचे प्रमाण १५-२० टक्के, शीघ्र वीर्यपतनाचे प्रमाण २० टक्के, लैैंगिक आकर्षण कमी होणे, इच्छा न होणे, लैैंगिक अध:पतन, लैैंगिक क्रियेवर परिणाम होणे अशा समस्या उद्भवतात. अशा रुग्णांना औैषधोपचार, समुपदेशन, सेक्स थेरपीबरोबरच व्यसनमुक्तीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जाते.- डॉ. नीलेश नाफडे, लैैंगिकतज्ज्ञबिडी वळण्याचे काम करणाऱ्या महिला कर्मचारी, तंबाखू, गुटखा आदींचे व्यसन असणाऱ्या महिलांमध्ये अनेक विकार उद्भवतात. त्यांच्यामध्ये तोंडाचा कर्करोग, तसेच गर्भपाताचे प्रमाण पाहायला मिळते, असेही डॉक्टरांनी सांगितले.