तळेगांव स्टेशन : मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम बांधवांनी आपला ओबीसी दाखल शासनाला दिला परत सवलती घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. सकल मराठा समाजाला कृतिशील समर्थनार्थ तळेगाव दाभाडे येथील सरसेनापती उमाबाई दाभाडे ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अमीन खान यांनी त्यांचा ओबीसी मूळ दाखला व समाज कल्याण खात्याचे रोजगार हमी कार्ड महाराष्ट्र शासनास आज साभार परत केले. मावळ तहसीलदारामार्फत सदर दाखला उपविभागीय दंडाधिकारी यांना गुरुवारी सुपूर्द केला.राज्यातील विविध भागातील शेतकरी आणि सकल मराठा समाज ज्या तऱ्हेने उपेक्षित, दुर्लक्षित, पीडित आणि आर्थिक दृष्ट्या रसातळाला जात आहे व न्यायासाठी आक्रोश करत आहे त्या मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शासनाला ओबीसी म्हणून दिलेल्या सर्व सवलती, योजना, आर्थिक सहाय्य व अनुदानासहित प्राप्त असलेले सर्व प्रकारचे आरक्षण हक्क स्वेच्छेने सोडून देत असल्याचे खान यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबत ते म्हणाले की, मला प्राप्त ओबीसीचा लाभ माझ्या मराठा समाजातील गरजु कोणा एका बहिणीसाठी राखी पौर्णिमेची भेट म्हणून देण्यास शासनाने मंजुरी दयावी अशी शासनाला विनंती केली आहे.मुस्लिम ओबीसी समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनी देखील ओबीसीचे हक्कसोड पत्र शासनास परत करून मराठा आणि इतर समाजातील गरीब असलेल्यांना आरक्षण टक्केवारीतून दिलासा देण्यासाठी असा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांना शिक्षण आणि नोकरीसाठी ओबीसीच्या कोणत्याही सवलती न घेण्याबाबत त्यांनी सांगितले असून त्यास त्यांच्या सिकंदर व सैफ या दोन्ही मुलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या दोघांचीही ओबीसी प्रमाणपत्रे ते दोघे शासनास लवकरच परत करणार असल्याचे खान यांनी सागितले.
मुस्लिम समाजाचा ओबीसी दाखला परत करत ‘त्यांनी’उभारला नवा आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 16:21 IST
मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शासनाला ओबीसी म्हणून दिलेल्या सर्व सवलती, योजना, आर्थिक सहाय्य व अनुदानासहित प्राप्त असलेले सर्व प्रकारचे आरक्षण हक्क स्वेच्छेने सोडून देत असल्याचे खान यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मुस्लिम समाजाचा ओबीसी दाखला परत करत ‘त्यांनी’उभारला नवा आदर्श
ठळक मुद्देमराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी घेतला निर्णय मराठा आणि इतर समाजातील गरीब असलेल्यांना आरक्षण टक्केवारीतून दिलासा देण्यासाठी असा प्रयत्न करावा असे आवाहन दोन मुलांचीही ओबीसी प्रमाणपत्रे ते दोघे शासनास लवकरच परत करणार