शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरती परीक्षेचा निकाल जाहीर; खुल्या गटासाठी ८५ गुणांचा ‘कट ऑफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 20:11 IST

पोलीस भरती निवड समितीने उमेदवारांनी आवेदन अर्जात भरलेल्या माहितीनुसार सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणानुसार ‘कट ऑफ’ यादी जाहीर केली...

पिंपरी : भावी पोलिसांना प्रतीक्षा असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ७२० शिपाई पदांच्या भरतीच्या लेखी परीक्षेचा सामाजिक व समांतर आरक्षण निहाय निकाल जाहीर झाला. खुल्या गटाची सर्वसाधारण वर्गासाठी ८५ गुणांची ‘कट ऑफ’ लागली आहे. लेखी परीक्षेला राज्यभरातून तब्बल एक लाख ८९ हजार ७३२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ८२ हजार ६०८ उमेदवारांनी परीक्षा दिली.

पोलीस भरती निवड समितीने उमेदवारांनी आवेदन अर्जात भरलेल्या माहितीनुसार सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणानुसार ‘कट ऑफ’ यादी जाहीर केली. एका पदासाठी दहा उमेदवार या प्रमाणानुसार ही ‘कट ऑफ’ यादी असून ११ हजार ५३४ उमेदवारांची यामध्ये निवड झाली आहे. हे उमेदवार कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करिता पात्र ठरले आहेत. 

सामाजिक व समांतर आरक्षण निहाय निकाल -खुला गट :सर्वसाधारण (८५), महिला (७९), खेळाडू (८२), प्रकल्पग्रस्त (८५), भूकंपग्रस्त (८१), माजी सैनिक (६९), अंशकालीन पदवीधर (३५), पोलीस पाल्य (७८), गृहरक्षक दल (७८)

ईडब्ल्यूएस (आर्थिकदृट्या मागास) :सर्वसाधारण (८१), महिला (६३), खेळाडू (७४), प्रकल्पग्रस्त (८१), भूकंपग्रस्त (७८), माजी सैनिक (३६), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (६३), गृहरक्षक दल (६२)

इतर मागास प्रवर्ग : सर्वसाधारण (७९), महिला (६७), खेळाडू (७०), प्रकल्पग्रस्त (७७), भूकंपग्रस्त (६२), माजी सैनिक (४२), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (६५), गृहरक्षक दल (५९)

विशेष मागास प्रवर्ग :सर्वसाधारण (७७), महिला (६४), खेळाडू (४६), प्रकल्पग्रस्त (६५), भूकंपग्रस्त (-), माजी सैनिक (३८), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (-), गृहरक्षक दल (४१)

भटक्या जमाती - ड :सर्वसाधारण (८१), महिला (६७), खेळाडू (६४), प्रकल्पग्रस्त (८२), भूकंपग्रस्त (-), माजी सैनिक (५३), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (-), गृहरक्षक दल (६०)

भटक्या जमाती - क :सर्वसाधारण (८१), महिला (६९), खेळाडू (६१), प्रकल्पग्रस्त (८१), भूकंपग्रस्त (६५), माजी सैनिक (५१), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (६२), गृहरक्षक दल (६४)

भटक्या जमाती - ब : सर्वसाधारण (८१), महिला (७२), खेळाडू (६९), प्रकल्पग्रस्त (७४), भूकंपग्रस्त (-), माजी सैनिक (३३), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (६९), गृहरक्षक दल (६९)

विमुक्त जाती - अ :सर्वसाधारण (८१), महिला (६९), खेळाडू (६८), प्रकल्पग्रस्त (७९), भूकंपग्रस्त (-), माजी सैनिक (३७), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (६७), गृहरक्षक दल (६७)

अनुसूचित जमाती :सर्वसाधारण (७१), महिला (५५), खेळाडू (४१), प्रकल्पग्रस्त (६२), भूकंपग्रस्त (४२), माजी सैनिक (४८), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (४२), गृहरक्षक दल (४१)

अनुसूचित जाती :सर्वसाधारण (७७), महिला (६७), खेळाडू (६०), प्रकल्पग्रस्त (७३), भूकंपग्रस्त (६८), माजी सैनिक (३३), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (६६), गृहरक्षक दल (५९)

‘कट ऑफ’नुसार यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार पदभरतीसाठी पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी होणार आहे. त्याबाबत लवकरच सूचना देण्यात येणार आहे. - डाॅ. काकासाहेब डोळे, पोलीस उपायुक्त (प्रशासन), पिंपरी-चिंचवड

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र