पळवून नेलेल्या डॉक्टरची सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:18 IST2019-04-17T00:16:13+5:302019-04-17T00:18:49+5:30
चालकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून डॉकटरला मोटारीसह दोघांनी मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चरोली येथून पळवून नेले.

पळवून नेलेल्या डॉक्टरची सुखरूप सुटका
पिंपरी : चालकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून डॉक्टरला मोटारीसह दोघांनी मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चरोली येथून पळवून नेले. पोलीस शोध घेत असतानाच डॉक्टर सोलापूर रोडवरील केडगाव चोफुला येथे असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली .
डॉ. शिवाजी पडवळ असे पळवून नेलेल्या डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आळंदी जवळील मरकळ येथील राठी पोलिबॉड कंपनीचे पडवळ हे संचालक आहेत. ते मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोटारीतून कंपनीचा चालक जितेंद्र भुजंग यांच्यासह चारहोली बुद्रुक येथील दाभाडे वस्ती मार्गे वडगाव धायरी येथे घरी जात होते. त्यावेळी दभादेवस्ती येथे रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी पडवळ यांच्या मोटारीला आडवी लावली. त्यानंतर 'तू आमच्या दुचाकीला कट का मारला' असे म्हणत आरोपींनी मोटारचालक भुजंग यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याना मोटारीतून बाहेर घेतले. त्यानंतर पडवळ यांना मोटारीसह पळवून नेले. याबाबत दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.
चार टीम तयार करून शहरात नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान एक टीम केडगाव चैअफूला येथे शोध घेत असताना पडवळ हे पंजाबी ढाबा येथे असल्याचे त्यांचे भाऊ यांना फोनवरून समजले. त्यानंतर तेथे जाऊन पोलिसांनी पडवळ यांना ताब्यात घेण्यात आले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.