शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

कांद्याची आवक निम्म्याने घटून भावात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:42 IST

चाकण बाजार : बटाटा आवक ६८२ क्विंटलने घटून भाव स्थिर; कांदा ११०० रुपये, तर बटाटा १७०० रुपये क्विंटल

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक निम्म्याने घटून १३० रुपयांनी भाव घटले. बटाटा आवक ६८२ क्विंटलने घटून भाव स्थिर राहिले. तरकारी बाजारात वांगी, काकडी, गवार, ढोबळी, चवळीचे भाव वाढले, तर कोबी, फ्लॉवर, दोडका, कारली, वालवड, शेवग्याचे भाव स्थिर राहिले. काकडी, फरशी, ढोबळी व दुधी भोपळ्याची आवक वाढली. कोथिंबिरीची आवक वाढली, तर मेथी, कोथिंबीर, शेपू व पालकचे भाव वाढले. जनावरांच्या बाजारात बैल व म्हशींची विक्री वाढली, तर गाय व शेळ्या-मेंढ्यांच्या विक्रीत घट झाली असून बाजारात एकूण दीड कोटीची उलाढाल झाली असल्याची माहिती सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली.

चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ३५० क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव ११०० रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ११०० क्विंटल झाली. बटाट्याचा कमाल भाव १७०० रुपयांवर स्थिर राहिला. भुईमूग शेंगांची १० क्विंटल आवक झाली. लसणाची एकूण आवक २५ क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव २ हजार ५०० रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक ४२५ पोती झाली. मिरचीचा भाव ३००० रुपयांवरस्थिर झाला. राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची ४,१५००० हजार जुड्यांची आवक होऊन २०० ते ७०० रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर ३ लाख ८५ हजार जुड्यांची आवक होऊन १०१ ते ५०० रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.शेपू आवक ७०००० हजार जुड्या झाली. २०१ ते ४०० असा जुड्यांनाभाव मिळाला.शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे :कांदा - एकूण आवक - ३५० क्विंटल. भाव क्रमांक १ : ११३० रुपये, भाव क्रमांक : १००० रुपये, भाव क्रमांक ३ : ८०० रुपये.बटाटा - एकूण आवक - ११०० क्विंटल. भाव क्रमांक १ : १७०० रुपये, भाव क्रमांक २ : १५०० रुपये, भाव क्रमांक ३ : १२०० रुपये. भुईमूग शेंग एकूण आवक - १० क्विंटल, भाव क्रमांक १ : ५०००, भाव क्रमांक २ : ४५००, भाव क्रमांक ३ : ४००० रुपये .लसूण - एकूण आवक - २५ क्विंटल. भाव क्रमांक १ : २५०० रुपये, भाव क्रमांक २ : २००० रुपये, भाव क्रमांक ३ : १८०० रुपये.पालेभाज्या :चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यामध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे :मेथी - एकूण १२३४० जुड्या (४०० ते ८०० रुपये ), कोथिंबीर - एकूण २४५३० जुड्या (५०० ते ९०० रुपये ), शेपू - एकूण ४५२० जुड्या (३०० ते ६०० रुपये), पालक - एकूण ३२९० जुड्या(५०० ते ८०० रुपये ).फळभाज्या :चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे :च्टोमॅटो : ९७२ पेट्या (५०० ते १००० रु.), कोबी : ३४१ पोती (५०० ते १००० रु.) फ्लॉवर - ३१८ पोती (४०० ते ८०० रु.), वांगी - ५१८ - पोती (२००० ते ३००० रु.), भेंडी - ३९४ पोती (२००० ते ३००० रु.), दोडका - २६९ पोती (२००० ते ३००० रु.) कारली : ३१८ डाग (१५०० ते २५०० रु.), दुधीभोपळा - ३१८ पोती (५०० ते १५०० रु.), काकडी - ३८१ पोती (५०० ते १२०० रु.), फरशी - १९४ पोती (१५०० ते २००० रु.), वालवड - १३२ पोती (२५०० ते ३५०० रु.), गवार - १६४ पोती (३००० ते ४००० रू.), ढोबळी मिरची - ५१८ डाग (१००० ते २००० रु.), चवळी - १९० पोती (१००० ते २५०० रु.), वाटाणा - ३१८ पोती (२००० ते ३२०० रु.), शेवगा - ४१ डाग (३५०० ते ४५०० रु.), हिरवी मिरची - ३३९ पोती ( १५०० ते २५०० रु.)जनावरे :चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या १५० जर्शी गार्ईंपैकी ९५ गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ४०,००० रुपये), १४० बैलांपैकी ७५ बैलांची विक्री झाली. ( १०,००० ते ३०,००० रुपये ), ९५ म्हशींपैकी ६५ म्हशींची विक्री झाली. ( २०,००० ते ८०,००० रुपये ),शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ३२५० पैकी २५७० शेळ्या-मेंढ्याची विक्री होऊन त्यांना (१५०० ते ९,००० ) रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात एकूण ९० लाख रुपये उलाढाल झाली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडChakanचाकणonionकांदा