शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Chinchwad Vidhan Sabha: चिंचवडमध्ये बंडखोरी कायम; अजितदादांच्या भेटीनंतरही नाना काटे अपक्ष लढण्यावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 16:28 IST

चिंचवड विधानसभेतून उमेदवारी न मिळाल्याने नाना काटेंनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुती मधील घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांनी अर्ज कायम ठेवले आहेत. बंडखोरी शमवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले. मात्र नाना काटेंनी माघार न घेतल्याचे सांगितले आहे. यावरून काटे बंडखोरी कायम ठेवणार असल्याचे सध्यातरी दिसते आहे.  

काटे म्हणाले,  दिवाळी निमित्त अजितदादांनी मला फोन केला भेटून जाईल असे सांगितले होते. त्यांनी मला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अपक्ष अर्ज मागे घेण्याबाबत काही चर्चा झाली नाही. चिंचवडमध्ये भाजपचा महायुतीचा उमेदवार आहे. त्याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आता तरी मी अर्ज मागे घेतला नाहीये. अपक्ष म्हणून लढण्यावर मी आणि भाऊसाहेब भोईर ठाम आहोत. अजितदादांची काही सूचना आल्यास तुम्ही माघार घेणार का? असे विचारले असता काटे म्हणाले, आता काही सांगता येणार नाही. त्यावेळीच निर्णय घेईल. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे.  उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आणि भाऊसाहेब भोईर यांनी अर्ज कायम ठेवले आहेत. त्यांच्या बंडखोरीने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. बंडखोरी शमविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले होते. त्यांनी पिंपळे सौदागर येथील नाना काटे यांच्या घरी भेट घेतली.

कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र

चिंचवड ची जागा महायुतीत भाजप ला गेली आहे. नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. म्हणून भेटायला आलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. मी सांगेल तीच निर्णय घ्यावा लागेल अस मी त्यांना सांगितलं आहे - अजित पवार 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणMahayutiमहायुती