शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नैराश्याने ग्रासलेल्या तरुणाला रियल लाइफचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 7:07 PM

लेकरांची होत असलेली वाताहत थांबावी यासाठी त्याने शहरात जाऊन काहीतरी कामधंदा शोधण्याचा निर्णय घेतला...

ठळक मुद्देपरभणीच्या तरुणांचे पुनर्वसन : काम मिळत नसल्याने डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी : चिंचवड येथील केएसबी चौकात २५ मे या दिवशी एक तरुण रात्रीच्या वेळी रस्त्यावर डोके आपटत होता. येथूनच हवालदार रवींद्र खाडे गस्त घालत असताना त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी वेळीच हस्तक्षेप करत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल केले. बेवारस दाखल केलेल्या रुग्णाच्या आयुष्याचा खडतर प्रवास रियल लाइफ रियल पीपल या संस्थेमुळे उलगडला.  संदीप कांबळे हा युवक मूळचा परभणीचा. गावाकडे आई, पत्नी आणि एक मुलगा, मुलगी असा सुखी परिवार. तिथे एका हॉटेलमध्ये तो वेटरची नोकरी करत होता. मात्र ते काम गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला उतरती कळा लागली. दोन भाऊ मुंबईमध्ये चांगल्या नोकरीस आहेत. मात्र त्यांचाही काही हातभार लागेना. गावामध्ये दुष्काळाची परिस्थिती असल्याने रोजंदारीचेही काही काम मिळेना. लेकरांची होत असलेली वाताहत थांबावी यासाठी त्याने शहरात जाऊन काहीतरी कामधंदा शोधण्याचा निर्णय घेतला. अवघे एक हजार रुपये घेऊन हा तरुण कामासाठी पुण्यात आला. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.   शहरात आल्यानंतर हा युवक काम शोधू लागला. भोसरी, चिंचवड, तळवडे या परिसरामध्ये कामासाठी कंपन्या फिरू लागला. खिशातले एक हजार रुपये संपत आले होते. काम मिळाले नाही तर आता खायचे काय हा प्रश्न त्याच्या पुढे होता. शोधूनही काम मिळत नसल्याने दोन लहानग्या लेकरांच्या आठवणीने तो व्याकूळ झाला होता. मी माझ्या कुटुंबासाठी काहीच करू शकत नाही हा विचार त्याला नैराश्येत घेऊन जात होता. याच नैराश्यातून उरलेल्या शंभर रुपयात त्याने मद्यप्राशन केले. त्या धुंदीमध्ये केएसबी चौकात स्वत:ला संपवण्याच्या हेतूने रस्त्यावर जोर-जोरात डोके आपटू लागला. त्यांने केलेला आत्महत्येचा प्रयत्न इतका भयंकर होता, की यामध्ये त्याला अपंगत्व आले. वायसीएममध्ये दाखल केल्यानंतर रिअल लाइफ, रिअल पीपल या संस्थेचे अध्यक्ष एम. ए. हुसैन, महादेव बोत्रे, आकाश शिरसाट, मंगेश सरकटे, कर्मचारी मिलिंद माळी, दत्ता वाघमारे यांनी त्या तरुणाची देखभाल केली. एक महिना तरुणाची सेवा करत त्याला अपंगत्वातून बाहेर काढले. रुग्णालयातून सोडल्यावर सर्व प्रकारची मदत करत त्या तरुणाला त्याच्या गावी सुखरूप पाठवले. 

रात्री गस्त घालत असताना केएसबी पुलाजवळ हा तरुण जखमी अवस्थेत आढळला. त्याचे कपडे पूर्ण रक्ताने माखले होते. रुग्णवाहिका बोलावून त्याला वायसीएममध्ये दाखल केले. काम नसल्यामुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.- रवींद्र खाडे, पोलीस. ..............बेशुद्ध अवस्थेत रात्रीच्या वेळी या तरुणाला वायसीएममध्ये दाखल केले होते. चौकशी केल्यानंतर त्याचे येथे कोणीही नसल्याचे आढळून आले. संस्थेच्या माध्यमातून या तरुणाला सर्व प्रकारची मदत करण्यात आली. आता तो वॉकरच्या मदतीने चालत आहे. त्याला त्याच्या घरी सुखरूप पाठवले आहे. यामध्ये रुग्णालय प्रशासन, डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका यांची मोलाची मदत मिळाली.- एम. ए. हुसैन, संस्थापक, रिअल लाइफ रिअल पीपल 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस