नाशिकच्या आदिवासी महिलेवर चिखलीत बलात्कार, आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2018 22:36 IST2018-05-20T22:36:03+5:302018-05-20T22:36:03+5:30

बांधकाम साईटवर फरशी बसविण्याच्या कामासाठी नाशिक चांदवड येथून आलेल्या महिलेवर चिखली, कुदळवाडीत एकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी आरोपी गोविंद सिंग (सध्या राहणार चिखली, मुळचा राजस्थान) यास निगडी पोलिसांनी अटक केली आहे. 

Rape of the tribal woman of Nasik | नाशिकच्या आदिवासी महिलेवर चिखलीत बलात्कार, आरोपी अटकेत

नाशिकच्या आदिवासी महिलेवर चिखलीत बलात्कार, आरोपी अटकेत

 पिंपरी - बांधकाम साईटवर फरशी बसविण्याच्या कामासाठी नाशिक चांदवड येथून आलेल्या महिलेवर चिखली, कुदळवाडीत एकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी आरोपी गोविंद सिंग (सध्या राहणार चिखली, मुळचा राजस्थान) यास निगडी पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेचे अंघोळ करीत असताना मोबाईलवर अर्धनग्न फोटो काढले. हे फोटो पतीला दाखविणार अशी भिती दाखवून तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले. एवढेच नव्हे तर याबद्दल कोणाला काही सांगितल्यास तुझ्या पतीला जीवे मारेन, अशी धमकी दिली. चिखली कुदळवाडीत घटना घडल्यानंतर पिडित महिलेच्या पतीने पोलिसांकडे दाद मागण्याची तयारी केली. पोलिसांकडे तक्रार दाखल होवू नये, यासाठी आरोपीने पिडित महिलेला नाशिक येथे तिच्या आईकडे सोडले. मात्र घडला प्रकार महिलेने नाशिक येथील दक्षता कमिटीच्या सदस्यांना सांगितला. त्यांनी पुण्यातील मानवी हक्क संरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांना याबाबत कळविले. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पुण्यातील कार्यकर्त्यांनी महिलेला निगडी पोलीस ठाण्यात आणले. तेथे आरोपीविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविराधोत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच रविवारी त्यास अटक करण्यात आली. 

Web Title: Rape of the tribal woman of Nasik