राजेश पाटील यांची बदली राजकीय सूडबुद्धीने; पिंपरीत एमआयएमच्या शहराध्यक्षाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 13:16 IST2022-08-18T13:16:02+5:302022-08-18T13:16:41+5:30
राजेश पाटील यांची १४ फेब्रुवारी २०२१ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली होती

राजेश पाटील यांची बदली राजकीय सूडबुद्धीने; पिंपरीत एमआयएमच्या शहराध्यक्षाचा आरोप
पिंपरी : महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची बदली राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली, असा आरोप ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी प्रसिद्धिपत्रकातून केला आहे. तसेच बदलीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड हे प्रगत शहर व स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते. राजेश पाटील यांची १४ फेब्रुवारी २०२१ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. आयुक्त म्हणून राजेश पाटील यांनी शहराचा नावलौकिक व दर्जा उंचावला. विविध योजना, निर्णय, संकल्पनांच्या माध्यमातून कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. श्रीकर परदेशी यांच्यानंतर राजेश पाटील हे कार्यक्षम आयुक्त म्हणून शहराला लाभले.
राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीकर परदेशी यांची मुदतपूर्व बदली केली होती. तोच कित्ता गिरवत एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारने राजेश पाटील यांची मुदतपूर्व बदली केली. संकुचित वृत्तीने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे, असा आरोप पत्रकातून केला आहे.