शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या रेस्टॉरंट अँड बारवर छापा; २१८ जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 12:39 IST

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने रहाटणी येथील जगताप डेअरी चौकातील स्पॉट १८ येथे शनिवारी रात्री ही कारवाई केली.

ठळक मुद्दे १०५ ग्राहकांवर विनामास्क प्रकरणी कारवाई ५२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

पिंपरी : कोराना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या दोन हॉटेलवर छापा टाकला. यात २१८ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून रोकड व इतर साहित्य जप्त केले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने रहाटणी येथील जगताप डेअरी चौकातील स्पॉट १८ येथे शनिवारी (दि. १४) रात्री ही कारवाई केली.

पहिल्या कारवाईत १८ डिग्रीज बार अँड लावूनचा मालक नीरज नेवाळे याच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच १०५ ग्राहकांवर विनामास्क प्रकरणी कारवाई केली. त्यांच्याकडून ५२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज नेवाळे आणि इतर आरोपींनी १८ डिग्रीज बार अँड लावून हा बार रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवला. त्यामुळे तेथे ग्राहकांची गर्दी झाली. कोररोना नियमांचे उल्लंघन झाले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. एक लाख ४०० रुपये रोख रक्कम जप्त केली‌.

दुसऱ्या कारवाईत योलो‌ बार अँड रेस्टोचा मालक समीर वाघज याच्यासह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विनामास्क प्रकरणी ११३ जणांच्या विरोधात कारवाई करून त्यांच्याकडून ५६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. स्पॉट १८ येथील योलो‌ बार अँड रेस्टो हे हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून कारवाई केली. हॉटेल मालक समीर वाघज याच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून ७४ हजार २२० रुपये जप्त केले. 

''रात्री दहापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी आहे. असे असतानाही आरोपींनी रात्री साडेअकरा ते बारापर्यंत हॉटेल सुरू ठेवले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली. हॉटेल सील करून त्यांचा परवाना रद्द करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येईल. असे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले आहे.''

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकhotelहॉटेल