दापोडीत घरामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 13:09 IST2019-05-09T13:06:04+5:302019-05-09T13:09:04+5:30

दापोडीमधील एका घरामध्ये आरोपी तीन महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असत.

raid on sex racket in the house at dapodi | दापोडीत घरामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

दापोडीत घरामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

पिंपरी : दापोडी येथील एका घरामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भोसरी पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास केली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू रमेश भाटिया (वय ६३, रा. दापोडी), पेपसिंह शेतानसिंह (वय २५, रा. दापोडी, मूळ रा. राजस्थान), रमेश शिवाजी सूर्यवंशी (वय २७, रा. थेरगाव, मूळ रा. लातूर), बंडू उत्तम चव्हाण (वय २५, रा. सुसगाव, मूळ रा. नांदेड), मारुती बळीराम शिंदे (वय ३५, रा. रहाटणी, मूळ रा. बीड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
दापोडीमधील एका घरामध्ये आरोपी तीन महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असत. तसेच ग्राहकांकडून मिळणारे पैसे स्वत:च्या फायद्याकरिता घेऊन त्यावर आपली उपजीविका चालवत. याबाबत भोसरी पोलिसांना माहिती मिळाली होती.
 

Web Title: raid on sex racket in the house at dapodi