शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

चिंचवडमधील डेअरीच्या कारखान्यावर छापा; तब्बल ५४६ किलो भेसळयुक्त पनीर जप्त

By नारायण बडगुजर | Updated: May 12, 2023 12:35 IST

भेसळयुक्त पनीर तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य मिळून एकूण चार लाख ६६ हजार ५२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : चिंचवडमधील महाराष्ट्र मिल्क डेअरी या भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारून कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ५४६ किलो भेसळयुक्त पनीर तसेच पनीर बनविण्याचे इतर साहित्य जप्त केले. पिंपरी -चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली.

साजीद मुस्तफा शेख (वय ३२, रा. पडवळनगर, थेरगाव), जावेद मुस्तफा शेख (वय ३८), कामगार राकेश श्रीबुध्दराम सिंग (वय २६), अल्ताफ हजरतद्दीन शेख (वय २७), अभिषेककुमार योगेशबाबु यादव (वय २२), सर्फराज शराफतउल्ला शेख (वय ३५, रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार प्रदीप गोडांबे व पोलिस नाईक आशिष बोटके यांना मिळालेल्या माहितीवरून, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह चिंचवड येथे असलेल्या महाराष्ट्र मिल्क डेअरीवर छापा मारण्यात आला. यात भेसळयुक्त पनीर तयार करण्याकरीता वापरत असलेले १४ हजार रुपये किंमतीचे १४० लिटर ॲसेटीक ॲसीड, सहा हजार ३२० रुपये किंमतीचे ६० लिटर आरबीडी पामोलीन तेल, चार हजार ५०० रुपये किंमतीचे २५ किलो ग्लिसरील मोनो स्टीयरेट, तीन लाख ३२ हजार ५०० रुपये किंमतीची ८७५ किलो स्किम्ड मिल्क पावडर, एक लाख नऊ हजार २०० रुपये किंमतीचे ५४६ किलो भेसळयुक्त तयार पनीर असा एकूण चार लाख ६६ हजार ५२० रुपये किंमतीचा मुद्देमाल अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी यांनी जप्त केला.खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहायक निरीक्षक उध्दव खाडे, सहायक उपनिरीक्षक अशोक दुधवणे, पोलिस अंमलदार प्रदीप गोडांबे, विजय नलगे, चंद्रकांत जाधव, किरण काटकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेmilkदूधFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागHealthआरोग्यSocialसामाजिक