शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव मावळात बनावट गुटखा तयार करणा-या कारखान्यावर छापा; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 18:12 IST

वडगाव मावळ हद्दीत बनावट गुटखा बनवून वितरण करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती

ठळक मुद्देबनावट गुटखा प्रकरणी कामशेत, खालापूर येथे देखील गुन्हे दाखलबनावट गुटख्याचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

वडगाव मावळ : बनावट गुटखा तयार करणा-या वडगाव येथील एका कारखान्यावर पोलिसांनी छापा मारून कच्चा माल यंत्रसामग्री, कार, असा एकूण ११ लाख ९८ हजार रूपयांचा मुद्दे माल जप्त केलाय. याप्रकरणी श्रीकांत बाळू चांदेकर (वय ३२ रा.ढोरे वाडा, वडगाव मावळ) याला अटक केली आहे. 

पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची निर्मिती, साठवण, विक्री व वाहतूक करण्यासाठी बंदी असताना, वडगाव मावळ हद्दीत बनावट गुटखा बनवून वितरण करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता, बनावट गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, यंत्र साधनसामग्री, चारचाकीसोबत श्रीकांत चांदेकर रंगेहाथ सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सोमवारी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी न्यायाधीशांनी चांदेकरला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय वडोदे करत आहेत.

मोठे रॅकेट उघडण्याची शक्यता 

बनावट गुटखा प्रकरणी कामशेत, खालापूर येथे देखील गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आणखी काहीजण सामील असून बनावट गुटख्याचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्या दिशेने तपास असल्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ