पिंपरी महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदाचा राहुल कलाटे यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 17:29 IST2021-03-16T17:28:52+5:302021-03-16T17:29:13+5:30

पक्ष आदेश आल्याने राजीनामा दिला..

Rahul Kalate resigns as Shiv Sena group leader in Pimpri Municipal Corporation | पिंपरी महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदाचा राहुल कलाटे यांचा राजीनामा

पिंपरी महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदाचा राहुल कलाटे यांचा राजीनामा

पिंपरी:  महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते  राहुल कलाटे यांनी गटनेतेपदाचा मंगळवारी राजीनामा दिला आहे. पक्ष आदेश आल्याने राजीनामा दिला आहे, असे कलाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे कलाटे यांनी राजीनामा दिला आहे. महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडून आले आहेत. राहुल कलाटे प्रभाग क्रमांक २५ वाकड, माळवाडी, पुनावळे, पंढारेवस्ती, भुजबळ, भूमकरवस्ती या प्रभागातून निवडून आले आहेत. 

कलाटे यांनी शहरप्रमुखपदी काम केले आहे. महापालिका निवडणुकीत निवडून आल्यानंतर शिवसेना गटनेतेपदी वर्णी लागली. त्यांनी दोन वर्षे स्थायी समितीचे सदस्यपद देखील भूषविले. तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात कलाटे यांनी निवडणूकही लढविली होती. १ लाख १२ हजार मते मिळाली होती.

Web Title: Rahul Kalate resigns as Shiv Sena group leader in Pimpri Municipal Corporation