शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनचालक परवान्यांचा कोटा झाला दुप्पट; एका दिवसात मिळणार ११२ जणांना लायसन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 7:45 PM

पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात वाहन चालविण्याच्या परवान्यांना मोठी मागणी

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाचे  कामकाज सुरू

पिंपरी : लॉकडाऊन शिथील झाल्याने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाचे  कामकाज सुरू करण्यात आले. वाहन चालविण्याचे शिकाऊ २१ तर पक्के ४९ परवाने एका दिवसात देण्यात येत होते. मात्र सोमवारपासून (दि. २९) हा कोटा दुप्पट केला असून, शिकाऊ ४२ तर पक्के ७० परवाने एका दिवसात देण्यात येतील. पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात वाहन चालविण्याच्या परवान्यांना मोठी मागणी आहे. मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सुरक्षेची काळजी घेत परवान्यांचे कामकाज केले जात आहेत. लॉकडाऊनपूर्वी एका दिवसात साडेतीनशेपर्यंत वाहन परवाने देण्यात येत होते. लॉकडाऊनमुळे आरटीओचे कामकाज बंद झाले. मात्र लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर मर्यादित स्वरुपात कामकाज सुरू झाले. त्यानंतर वाहन परवाने देण्यात आले. मात्र त्यासाठी 'अपॉंइन्मेन्ट' घेणे अनिवार्य केले. २२ जून ते २६ जून या सहा दिवसामध्ये ९८ नवीन वाहन चालक परवान्यासाठी अर्ज आले. ती संख्या वाढविण्यासाठी वाहन परवान्याचा कोटा वाढविण्यात आला आहे.

पुण्यात सुरक्षेचा आढावा घेणारपुणे आरटीओकडून एका दिवसात २८५ शिकाऊ आणि पक्के परवाने देण्यात येत होते. या कामकाजाचा तसेच सुरक्षेचा आढावा पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. उपलब्ध मनुष्यबळ याचाही यावेळी विचार केला जाणार आहे. त्यानंतर वाहन परवान्यांचा कोटा वाढविण्यात यावा किंवा नाही याबाबत निर्णय होईल, अशी माहिती पुण्याचे प्रादेश्कि परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.

............................

वाहन परवाना चाचणीसाठी घ्यावयाची दक्षता - दोन अर्जदारांमध्ये सहा फुटाचे अंतर असावे- प्रत्येक चाचणीनंतर संगणक तसेच की-बोर्ड सॅनिटाईज करणे- कार्यालयात प्रवेशासाठी मास्क व हँडग्लोज अनिवार्य- प्रत्येक उमेदवाराच्या चाचणीनंतर ड्रायव्हिंग स्कूल चालकांनी वाहनाचे निर्जंतुकीकरण करावे

............

सुरक्षिततेचे निकष पाळून उपलब्ध मनुष्यबळात कामकाज सुरळीत होत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत आहे. वाहन चालक परवान्यांची मोठी मागणी आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना करून परवान्यांचा कोटा सोमवारपासून दुप्पट केला आहे. विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRto officeआरटीओ ऑफीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर