शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेत अस्वच्छतेचा पंचनामा, कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 19:30 IST

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे अस्वच्छ राहिल्यास, पाणी समस्येला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी..

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या सदस्यांनी अस्वच्छतेचा केला पंचनामा

पिंपरी : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झोपडपट्टीतील नागरिकांना स्वच्छतागृह बांधून देण्याच्या विषयांवर झालेल्या चर्चेत सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी अस्वच्छतेचा पंचनामा केला. प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यावर शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे अस्वच्छ राहिल्यास, पाणी समस्येला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश महापौर राहुल जाधव यांनी दिले.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील विषयपत्रिकेवर स्वच्छ भारत अभियानांतर्गत झोपडपट्टीतील नागरिकांना स्वच्छतागृह बांधून देण्याच्या विषय अवलोकनासाठी ठेवला होता. त्यावर चर्चेत सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या सदस्यांनी अस्वच्छतेचा पंचनामा केला. प्रशासनावर जोरदार टीका केली. हागणदारीमुक्त शहर झाल्याचा दावा खोटा आहे, अशी टीकाही केली. 

महापौर राहुल जाधव म्हणाले, स्वच्छतागृहाची साफसफाई न केल्यास ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे. वायसीएमएच रुग्णालयातील शौचालय अतिशय अस्वच्छ आहेत. तेथील शौचालयाची साफसफाई करण्यात यावी. त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. नाल्यांची साफसफाई करावी. नाल्यात सोडले जाणारे मैलापाणी बंद करून ड्रेनेजमध्ये सोडावे. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीटंचाईत पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन करत पाणी चोरावर कारवाई करणार तसेच नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात दोषी आढळल्यास अधिकाऱ्यांवर, स्वच्छतेत हलगर्जीपणा करणारे ठेकेदार किंवा आरोग्य निरीक्षकांवरही कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरात चौदा हजार शौचालये बांधली आहेत. त्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नियमितपणे शौचालयांची साफसफाई करून घ्यावी. पाणी उपलब्ध करून द्यावे. पुनर्प्रक्रिया केलेले पाणी शौचालयाच्या वापरासाठी उपलब्ध करून द्यावे. शौचालय अस्वच्छ आढळल्यास आरोग्य निरीक्षकावर निलंबनाची कारवाई केली जाईल. मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले,खरच शहर हागणदारी मुक्त आहे का? मग आपण बिले कोणाला देतो. हा प्रश्न आहे. वर्षभरात किती स्वच्छतागृहे झाली याची माहिती द्यावी.शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, शहर स्वच्छ ठेवण्यात अधिकारी कमी पडत आहेत. उत्पन्नवाढीच्या नावाखाली पत्राशेडला परवानगी देण्याचे नवे खूळ काढले आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडणार आहे. अनधिकृत फलेक्सबाजीवरही प्रशासनाचे नियंत्रण नाही. विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले,स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. आपले हगणदारीमुक्त शहर केवळ कागदावरच आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसMNSमनसे