पुणे - चाकण येथील सततची वाहतूक कोंडी ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. या समस्येचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनातही उमटले होते. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. ८) पहाटे चाकणच्या तळेगाव आणि आंबेठाण चौकात भेट देऊन वाहतूक कोंडीच्या समस्येची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांसोबत चर्चा करून अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे-नाशिक महामार्गाने कारने येऊन तळेगाव चौकात, आंबेठाण चौकात औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडीची व परिसराची पाहणी केली. यानंतर खराबवाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका खासगी कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी तिथे भाषण सुरू असताना भाजपचे कार्यकर्ते बाळासाहेब नाणेकर यांनी, “अजितदादा आम्ही पाच वेळा आंदोलन केली आहेत. आमचे जीव जात आहेत, असे सांगितले.
तुला अक्कल, आम्ही बिनडोक...अजित पवार संतापले; नेमकं काय घडलं ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 18:51 IST