शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

 स्मार्ट सिटी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा संबंधच नाही..! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 10:21 IST

कंपनी सचिवांची दर्पोक्ती : पगार करण्यासाठी पैशांचा अभाव; कार्यालयाचे दरमहा भाडे भरणेही कठीण; दोन वर्षांपासून महापालिकेचा ७० कोटींचा खर्च

पिंपरी : सद्य:स्थितीत स्मार्ट सिटीला स्वतःचा खर्च भागवणे मुश्कील झाले आहे. पगार करण्यासाठी पैसे नसल्यामुळे अभियंते व कर्मचाऱ्यांची हकालपट्टी सुरू करण्यात आली आहे. कार्यालयाचे दरमहा भाडे भरणेही कठीण झाले आहे. त्यासाठी महापालिका विशेष निधीची तरतूद करत वर्षाला ७० कोटी खर्च करत आहे. मात्र, स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना राज्य आणि केंद्र सरकारचा निधी येतो. त्यामुळे महापालिकेचा आणि स्मार्ट सिटीचा काहीच संबंध नाही, अशी दर्पोक्ती पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या चित्रा पवार यांनी शुक्रवारी केली.स्मार्ट सिटीचा पाच वर्षांचा कालावधी २०२३ मध्ये संपल्यानंतर वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. त्याला परत दोनदा वाढीव मुदत देण्यात आली. तो कालावधी जून २०२५ मध्ये संपत आहे. त्यानंतर स्मार्ट सिटीचा संपूर्ण खर्च मिळणाऱ्या उत्पन्नातूनच भागवावा लागणार आहे. त्यासाठी पॅन सिटीमधील सिटी नेटवर्क, सौरऊर्जा, व्हीएमडी प्रकल्पातून आर्थिक स्रोत सुरू होईल, तसेच या प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नावर स्मार्ट सिटीचा संचलन खर्च भागवणे शक्य असल्याचा तर्क अधिकाऱ्यांनी बांधला होता. मात्र, तसे न होता पूर्णत: महापालिकेला खर्च भागवावा लागत आहे.

काही प्रकल्प अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार यांच्यातील संगनमतामुळे संपूर्ण कारभार संशयित आहे. त्यामुळे बहुतांश प्रकल्प अपूर्ण आहेत. आता स्मार्ट सिटीला स्वतःचा खर्च भागवणेदेखील मुश्कील झाले आहे. त्यातही महापालिका आयुक्तच या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याने तो खर्च महापालिकेच्या माथी मारला जात आहे. महापालिकेचे फक्त २५ टक्के...

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी ही स्वतंत्र संस्था आहे. स्मार्ट सिटीला केंद्र सरकार ५० टक्के अनुदान देते, तर राज्य शासन २५ टक्के, तर महापालिका २५ टक्के अनुदान देते. ते अनुदान संपले नसून त्याचआधारे काम सुरू आहे. महापालिका यासाठी पैसे खर्च करत नाही. त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आयुक्त असतात. बाकी महापालिकेचा काही संबंध नसल्याचेच चित्रा पवार यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, वरिष्ठांना मुदतस्मार्ट सिटीचा फुगा फुटल्याने प्रकल्प विकसित करण्यासाठी नियुक्त केलेल्या महापालिकेतील अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकण्यास सुरुवात केली आहे. सल्लागाराच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी केल्यानंतर मुदत संपल्याचे कारण देऊन त्यांना कार्यमुक्त केले जात आहे. काही अभियंते व इतर कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होत असल्याचे कारण देत घरी बसविण्यात आले आहे. मात्र, काही अधिकारीच वरिष्ठांशी सलगी करत मुदत वाढवून घेत आहेत.

स्मार्ट सिटीचा निधी २०२३ पर्यंत विविध प्रकल्पांसाठी खर्च करण्यात आला आहे. त्या निधीतून काही प्रकल्पांचे काम सुरू आहे. मात्र, त्याखेरीज महापालिका फक्त स्मार्ट सिटीसाठी वर्षाकाठी ७० कोटी रुपये खर्च करत आहे.- प्रवीण जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महापालिका 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेSmart Cityस्मार्ट सिटी