शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत पाच वर्षांत केवळ १०८ पुरुषांनी केली कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:34 IST

- नसबंदीबाबत उदासीनता, सक्षम जनजागृतीची गरज

पिंपरी : शहरात कुटुंब नियोजनासाठी पुरुषांपेक्षा महिलाच अधिक जागृत असल्याचे दिसून येत आहे. पुरुषप्रधान संस्कृतीच्या पगड्यामुळे पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकडे पाठ फिरविली आहे.शहरातील महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण अत्यल्प आहे. गैरसमजातून पुरुषांनी नसबंदीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षांत फक्त १०८ पुरुषांनी नसबंदी केली आहे.शहरात गेल्या वर्षभरात ७ हजारांहून अधिक महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली आहे. मात्र, शहरातील अवघ्या २६ पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे स्पष्ट झाले आहे. गैरसमज अन् अनुदान..डॉक्टरांच्या मतानुसार, आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित गर्भारपण रोखण्यासाठीचा उपाय म्हणजे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया होय. पुरुषांनी नसबंदी केल्यास पुरुषांच्या शरीरावर काहीही विपरीत परिणाम होत नाही. शस्त्रक्रिया करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला १ हजार ५०० रुपयांचे अनुदानही सरकारकडून दिले जाते. तरीही गैरसमज, अंधश्रद्धा व महिलांचा विरोध यामुळे पुरुष नसबंदी करत नसल्याचे चित्र आहे.पुरुष नसबंदी कमी असण्याची कारणे...- नसबंदीने वंध्यत्व, नपुंसकता येते हा गैरसमज- स्त्रियांकडून पुरुष नसंबदीला केला जाणारा विरोध- पुरुष सहजासहजी तयार होत नाहीत- स्त्रियांनीच नसबदी करावी ही पारंपरिक मानसिकता- अनेक समाजात पुरुष नसबंदीबाबत अंधश्रद्धा असणे पुरुष संतती नियमन शस्त्रक्रिया आकडेवारीवर्ष : शस्त्रक्रिया२०२०-२१ ०८२०२१-२२ २१२०२२-२३ ३०२०२३-२४ २३२०२४-२५ २६एकूण : १०८गेल्यावर्षी महापालिका रुग्णालय शस्त्रक्रियाआकुर्डी रुग्णालय - ०३जिजामाता रुग्णालय – ०५थेरगाव रुग्णालय - ०१माऊली हॉस्पिटिल (खासगी) – ०१स्वर्ण हॉस्पिटल (खासगी) -०२सांगवी हॉस्पिटल – ०४यमुनानगर हॉस्पिटल – ०२भोसरी रुग्णालय – ०१तालेरा रुग्णालय – ०५वायसीएम रुग्णालय – ०२- एकूण - २६ खासगी रुग्णालयांतही सोयशहरात सरकारी रुग्णालयांबरोबर खासगी रुग्णालयांतही पुरुषांच्या नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येतात. माऊली हॉस्पिटलमध्ये एक, तर स्वर्ण हॉस्पिटलमध्ये दोन शस्त्रक्रिया गेल्यावर्षी करण्यात आल्या आहेत. 

पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेमुळे वंध्यत्व, नपुंसकता येण्याची पुरुषांना भीती असते; पण हा गैरसमज आहे. पुरुषांच्या नसबंदीस अनेकदा घरातून विरोध होतो. अनेक समाजात याबाबत अंधश्रद्धा आहेत. तसेच पुरुषप्रधान संस्कृती याला कारणीभूत आहे. समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे. - डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र