शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

पुणे मेट्राेचे डबे रुळावर ; लवकरच हाेणार चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 20:37 IST

पुणे मेट्राेचे डबे पिंपरीमध्ये दाखल झाले असून आज ते रुळावर चढविण्यात आले. लवकरच त्यांची चाचणी घेण्यात येणार आहे.

पिंपरी : स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोच्या पहिल्या टप्यात पिंपरी ते दापोडी काम पूर्णत्वास येत असून मेट्रो रेल्वेचे डबे रविवारी शहरात आले होते. हे डबे सोमवारी सकाळी मार्गिकेच्या रूळावर चढविण्यात आले आहेत. लवकरच चाचणीही घेण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महा मेट्रोचा रेल्वेचे डबे नागपूरवरून रविवारी वल्लभनगर येथे दाखल झाले. त्या डब्याचे पूजन महापौर उषा ढोरे व स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्या हस्ते झाले होते. सोमवारी सकाळी डबे रूळावर चढविण्यासाठी पाचशे टनाची महाकाय क्रेन आणण्यात आली होती. क्रेनच्या सहाय्याने स्पॅनवर चढवून रूळावर ठेवले. डब्याचे नुकसान काही होऊ नये आणि तो कोठून वाकला जाऊ नये म्हणून जॅक लावले होते. तसेच संरक्षण म्हणून विशिष्ट लोखंडी सांचा बनवून हे डबे अत्याधुनिक पद्धतीने उचलून सुरक्षितपणे रूळावर ठेवले होते. त्यानंतर कोचला कर्मचाऱ्यांनी ढकलत काही अंतर चालविण्याचा प्रयत्न केला आहे.

वाहतूकीत बदलजुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खराळवाडी ते नाशिक फाटयापर्यंतवाहतुकीत बदल केला आहे. मंगळवारपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत एच. ए. कंपनीसमोरील मेट्रोच्या पिलरपासून पिंपरीहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक खराळवाडी येथून मुंबई-पुणे मार्गावरील ग्रेड सेपरेटरमध्ये वळविली आहे. हा बदल नाशिक फाट्यापर्यंत राहील. खराळवाडी येथून एच. ए कंपनी वसाहतीकडे जाणाऱ्या वाहनांना सेवा रस्त्याने जाता येईल. एच. ए. कंपनीसमोरील अंडरपास नेहरूनगरकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला राहील. मात्र, पुण्याकडे जाणारा मार्ग बंद राहणार आहे; तसेच गुरुवारी सकाळी सात ते शनिवारी सकाळी सातपर्यंत एचए कंपनीसमोरून पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक नाशिक फाटा येथून उलट दिशेने खराळवाडीपर्यंत जाईल. त्यानंतर पुणे-मुंबई लेनवरून वाहतूक सुरळीत होईल, असे कळविले आहे.

विद्युत काम झाल्यानंतर हाेणार चाचणी मेट्रो मार्गिकेवरील विद्युत काम, सिग्नल व्यवस्थचे काम पूर्ण झाल्यानंतर तसेच, रेल्वे विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महामेट्रोकडून चाचणी घेण्यास सुरूवात केली जाणार आहे. येत्या पाच दिवसात दुसरा मेट्रो रेल्वे पिंपरीत दाखल होणार आहे, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सागितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMetroमेट्रो