शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भावकीतील मुलीला गाडीतून घरी सोडल्याच्या वादातून तरुणावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:53 IST

वडगाव मावळ येथील घटना : तरुण बचावला; चार संशयित फरार; शोधासाठी पोलिसांची पथके रवाना

वडगाव मावळ : भावकीतील शालेय मुलीला गाडीतून सोडल्याच्या वादातून चार तरुणांनी एकावर गोळीबार केला. त्यानंतर चारही संशयित पळून गेले. वडगाव मावळ येथील केशवनगरमध्ये सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

अक्षय एकनाथ मोहिते (वय २८, रा. पवारवस्ती, केशवनगर, वडगाव मावळ, ता. मावळ) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सौरभ रोहिदास वाघमारे (रा. कुरकुंडे, ता. खेड, जि. पुणे), अभिजित राजाराम ओवाळ (रा. सांगवी, ता. मावळ), रणजित बाळासाहेब ओव्हाळ (रा. सांगवी, ता. मावळ), प्रथमेश दिवे (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय यांचा नातेवाईक असलेला मुलगा दहावीमध्ये शिकत आहे. त्याने सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) दुपारी तीन वाजता संशयितांच्या भावकीतील मुलीला शाळेतून तिच्या घरी सोडले होते. त्यावरून संशयितांनी त्याला पाच वाजता शाळेच्या बाहेर मोटारीत जबरदस्तीने बसवून मारहाण केली होती.

त्यावरून फिर्यादी अक्षय आणि संशयितांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर साडेसहाच्या सुमारास अक्षय मित्रांसह केशवनगरमधील एकवीरा चौकात थांबले होते. त्यावेळी संशयित रणजित आणि प्रथमेश दुचाकीवरून आले. रणजितने अक्षय यांना शिवीगाळ केली. त्यानंतर सौरभ आणि अभिजित हेही दुचाकीवरून तेथे आले. सौरभने शिवीगाळ करून त्याच्याकडील पिस्तुलातून अक्षय यांच्या दिशेने गोळी झाडली. परंतु गोळी झाडली गेली नाही. त्यातील काडतूस खाली पडले. त्यावेळी अक्षय आणि त्यांचे मित्र तिथून पळून जात असतानाच सौरभने पुन्हा एकदा पिस्तुलातून गोळीबार केला; परंतु कोणालाही गोळी लागली नाही. त्यानंतर अक्षय जवळच असलेल्या हाउसिंग सोसायटीत लपून बसले. काही वेळाने संशयितांनी गाडीवरून पोबारा केला.

गोळीबारामध्ये कोणीही जखमी झाले नाही. संशयितांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि वडगाव मावळ पोलिस ठाण्याची दोन पथके रवाना झाली आहेत. पोलिस निरीक्षक कुमार कदम तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी