शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘आमचे आधार कार्ड तुम्ही घेतले’ म्हणत खिशातील १५ हजार हिसकावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 20:14 IST

आधार कार्डच्या बहाण्याने जवळ येत एकाच्या पॅन्टच्या खिशात हात घालून १५ हजार रुपये काढून घेण्यात आले, तसेच शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

पिंपरी : ‘आमच्या बहिणीचे आधार कार्ड तुम्ही घेतले आहे’, असे म्हणून आधार कार्डच्या बहाण्याने जवळ येत एकाच्या पॅन्टच्या खिशात हात घालून १५ हजार रुपये काढून घेण्यात आले, तसेच शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. २०) मध्यरात्री तीनच्या सुमारास गांधीनगर येथील लोखंडे सभागृहाजवळ घडली.

याबाबत मोहम्मद शाहनवाज आफताब आलम (वय २३, रा. कदम चाळ, गांधीनगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आधी अनोळखींविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, काही तासांतच तीन संशयितांना शोधून अटक केली.

दिनेश बाळू मंडपे (३३, रा. साई अपार्टमेंट, पिंपरी), संतोष रामकंपा (३०, रा. छत्रपती शाहू हौसिंग सोसायटी) व प्रबुद्ध सुरेश रोकडे (२३, रा. आर-३, आदर्शनगर, पिंपरी), अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद शाहनवाज आलम यांचा बंधू पिंपरी रेल्वे स्टेशनला घरातून निघाले होते. ते गांधीनगर येथील लोखंडे सभागृहाजवळ आले असता संशयित त्यांच्याजवळ आले. ‘आमचे बहिणीचे आधारकार्ड तुम्ही घेतले आहे’, असे म्हणून म्हणत मोहम्मद यांच्या खिशात हात घालून १५ हजार काढून घेतले, तसेच त्यांना मारहाण करून पळून गेले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी