पिंपरी : वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. वाहन चालविण्याचा परवाना, वाहन नोंदणी, ई-चालान यांसारख्या सेवांच्या नावाखाली अनेक नागरिकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे.
पिंपरी-चिंचवड परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव म्हणाले, फसवणूक करणारे मोबाइल एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेशांद्वारे “चलन बाकी आहे”, “परवाना सस्पेंड होणार आहे” अशा धमकीपर संदेशांसह अनधिकृत पेमेंट लिंक पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत.
परिवहन विभागाने याबाबत स्पष्ट सांगितले की, आरटीओ कार्यालय किंवा परिवहन विभाग नागरिकांना कधीही व्हॉट्स ॲप्सवरून पेमेंट लिंक पाठवत नाही. तसेच अज्ञात एपीके फाइल्स डाउनलोड केल्यास मोबाइलमधील ओटीपी, बँकिंग माहिती आणि इतर संवेदनशील माहिती चोरी होण्याचा धोका आहे. अधिकृत सरकारी संकेतस्थळांचाच वापर करावा. कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यानंतर तत्काळ नॅशनल सायबर क्राइम पोर्टलचे सायबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांक १९३० किंवा जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नोंदवावी.
Web Summary : Transport Department warns against fake e-challan links, websites, and apps used for fraud. Scammers send messages demanding payment through unofficial links, potentially stealing personal and financial data. Use official government websites and report suspicious activity to cybercrime authorities.
Web Summary : परिवहन विभाग ने धोखाधड़ी के लिए इस्तेमाल किए जाने वाले फर्जी ई-चालान लिंक, वेबसाइटों और ऐप्स के खिलाफ चेतावनी दी है। धोखेबाज अनधिकृत लिंक के माध्यम से भुगतान की मांग करते हुए संदेश भेजते हैं, जिससे व्यक्तिगत और वित्तीय डेटा चोरी हो सकता है। आधिकारिक सरकारी वेबसाइटों का उपयोग करें और साइबर अपराध अधिकारियों को संदिग्ध गतिविधि की रिपोर्ट करें।