उरुळी कांचन - उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत हुंड्याच्या सततच्या मागणीमुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पती, सासू-सासरे आणि दीर अशा चार जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार हेमलता बाळासाहेब मगर (वय 50, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे) यांनी दिली आहे.तक्रारीनुसार, फिर्यादी यांची मुलगी दिप्ती हिस हिचा विवाह रोहन कारभारी चौधरी याच्याशी झाला होता. विवाहानंतर 25 डिसेंबर 2019 ते 24 जानेवारी 2026 या कालावधीत दिप्ती हिच्याकडे चारचाकी वाहनासाठी हुंड्याची मागणी करण्यात येत होती. वेळोवेळी पैशांची मागणी करून मानसिक त्रास दिला जात होता, तसेच जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून दिप्ती हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या आत्महत्येस पती रोहन चौधरी, सासू सुनिता चौधरी, सासरे कारभारी चौधरी व दीर रोहित चौधरी (सर्व रा. कडवस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) हे जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करत असून, गुन्हा पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे यांनी दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस आणि पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
Web Summary : Pune woman ends life due to relentless dowry demands, including a car. Husband, in-laws, booked for harassment and forced abortion. Police investigate.
Web Summary : पुणे में दहेज की मांग से परेशान होकर महिला ने आत्महत्या की। पति और ससुराल वालों पर दहेज उत्पीड़न और जबरन गर्भपात का मामला दर्ज।