स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

By नारायण बडगुजर | Updated: March 18, 2024 20:22 IST2024-03-18T20:22:44+5:302024-03-18T20:22:55+5:30

पीडित चार महिलांची पोलिसांनी केली सुटका

Prostitution in spa centers exposed | स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

पिंपरी : स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा मारून कारवाई केली. यात पीडित चार महिलांची सुटका केली. निगडी येथील इन्स्पिरिया माॅलमधील फोनिक्स स्पा सेंटरमध्ये शनिवारी (दि. १६) रात्री सव्वाआठच्या सुमारास ही कारवाई केली.

दिनेश कुमार गुप्ता (३०, रा. मुंबई) आणि एक महिला यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अंमलदार सोनाली माने यांनी याप्रकरणी रविवारी (दि. १७) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनिक्स स्पा नावाचे मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा लावत स्पा सेंटरवर छापा मारला.

संशयितांनी चार महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला असल्याचे समोर आले. यामध्ये पोलिसांनी चार महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. 

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस अंमलदार मारुती करचुंडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे, सोनाली माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Prostitution in spa centers exposed