शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी लॉकडाऊन काळात केला तब्बल दोन कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 19:34 IST

लॉकडाऊन काळात प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंध व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांत ५३४ गुन्ह्यांची नोंद झाली.

ठळक मुद्देविविध प्रकारची कारवाई : पिंपरी-चिंचवड पोलिसांची कामगिरी३९२ जणांना पोलिसांनी अटक तर दोन कोटी १८ लाख ४० हजार ८५० रुपयांचा माल जप्त

पिंपरी : कोरोना महामारी रोखण्यासाठी पोलिसांनी लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला. त्यासाठी लॉकडाऊन काळात विविध प्रकारची कारवाई करून दोन कोटी ६५ लाख ७५ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रतिबंधित मालाची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणे, गुटखा, अमली पदार्थ बाळगणे आणि त्याची विक्री करणे, जुगार खेळणे यांसारख्या कारवाईचा यात समावेश आहे. लॉकडाऊन काळात प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंध व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांत ५३४ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यात ३९२ जणांना पोलिसांनीअटक केली. तर दोन कोटी १८ लाख ४० हजार ८५० रुपयांचा माल जप्त केला. जुगार खेळल्याप्रकरणी ५१ गुन्हे दाखल करून १४४ जणांना अटक केली. त्यात तीन लाख ८३ हजार ६८१ रुपयांचा माल जप्त केला. अवैध गुटखा बाळगणे, विक्री आणि वाहतूक केल्याप्रकरणी १४ गुन्हे दाखल करून २० आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ३६ लाख ७१ हजार ५१९ रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. अवैध तंबाखूजन्य पदार्थ विक्रीप्रकरणी १२ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ५४ हजार २६० रुपयांचा माल जप्त केला. अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी १३ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक झाली. त्यांच्याकडून पाच लाख २५ हजार २०० रुपये किमतीचा १५ किलो ९७० ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केला.लॉकडाऊनच्या काळात दुकाने सुरू ठेवणे, खासगी व व्यापारी वाहन चालविणे, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणाºया ३०,८२१ जणांवर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये खटले दाखल केले. तर मास्क न घालणाºया ६६६४ नागरिकांवर देखील भादवि कलम १८८ व साथ रोग प्रतिबंकध कलम ३ अन्वये कारवाई केली. 

विनाकारण बाहेर फिरणे तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ५१०२ वाहने जप्त केली. त्यामध्ये दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि अन्य वाहनांचा समावेश आहे. पोलिसांनी कंटेन्मेंट झोनमध्ये ११५८ जणांवर कारवाई केली. बेकायदेशीररित्या नमाज आणि मिरवणुकीसाठी एकत्र आल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल केले आहेत. जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने विक्री करणे, जीवनावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३ गुन्हे दाखल केले आहेत. बेकायदेशीर कामगार वाहतूक केल्याप्रकरणी २२ गुन्हे तर सोशल मीडियावर कोरोना काळात अफवा आणि चुकीची माहिती पसरविल्याबाबत पोलिसांनी सात गुन्हे दाखल केले. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी १६ गुन्हे दाखल आहेत.

लॉकडाऊनमध्ये दिले ९१८९६ पासपिंपरी - चिंचवड पोलिसांनी लॉकडाऊन काळात ९१८९६ ई- पास दिले. नागरिकांनी नियंत्रण कक्षाला ६६३८ कॉल केले. तसेच व्हॉटसअ?ॅपवर २२४१ संदेश प्राप्त झाले. त्यानुसार पोलिसांनी नागरिकांना प्रतिसाद देऊन त्यांना मदत उपलब्ध करून दिली.

महापालिका व पोलिसांचे संयुक्त पथकलॉकडाऊन काळात विविध प्रकारच्या कारवाईसाठी महापालिका व पोलिसांचे संयुक्त पथक कार्यान्वित होते. या पथकाने अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली. यात १८२० हातगाड्या जप्त करून ५४ लाख ६० हजारांचा दंड वसूल केला. तीन व चारचाकी १६९ टेम्पो जप्त करून २५ लाख ३५ हजारांचा दंड वसूल केला. प्लास्टिक कॅरेट, वजन काटा आदी किरकोळ वस्तू जप्त करून २५ लाख वसूल केले. या कारवाईत एकूण एक कोटी चार लाख १५ हजारांचा दंड वसूल केला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक