The project was incomplete after increased expenditure at the G.d.madgulakar Theater in Akurdi pradhikran | आकुर्डी प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृह प्रकल्प वाढीव खर्च करूनही अपूर्णच
आकुर्डी प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृह प्रकल्प वाढीव खर्च करूनही अपूर्णच

ठळक मुद्देस्थायी समितीची मेहेरबानी आकुर्डी-प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृह कामासाठी ठेकेदाराला दोनवेळा मुदतवाढ

विश्वास मोरे-  

पिंपरी : आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे काम गेल्या चार वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. दोन वेळा मुदतवाढ दिली असतानाही काम पूर्ण झालेले नाही. यापूर्वी ३७ कोटींचा खर्च झाला असताना प्रकल्प अपूर्णच आहे. आता पुन्हा २३ कोटींचा वाढीव खर्च करण्यास मान्यता देत स्थायी समिती ठेकेदारांवर मेहरबानी करीत आहे. 
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकुर्डी, प्राधिकरणात महाकवी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह उभारण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात २०१३ मध्ये निविदा प्रक्रिया राबविली. यासाठीएम. आर. गंगाणी अ‍ॅण्ड ब्रदर्स या ठेकेदाराला काम दिले. त्यानंतर कार्यारंभ आदेश ११ नोव्हेंबर २०१४ ला दिला. कामाची मुदत तीन वर्षांची होती.तरीही काम पूर्ण झाले नाही.  नाट्यगृहातील मुख्य प्रेक्षागृहाचे चार मजली इमारत, चेंजिंग रूम व बारा कलाकारांसाठी राहण्यासाठी हॉटेल रूम, आणि पाच हजार चौरस फूट आकारात रेस्टॉरंट, त्याच्या पहिल्या मजल्यावर उद्योजक व शैक्षणिकवापरासाठी अडीचशे आसन क्षमतेचा हॉल आणि दुसºया मजल्यावर दोनशे वीस आसन क्षमतेचा छोटा हॉल असे नियोजन केले. त्यात इमारतीचे बांधकाम, खोदाई, आरसीसी काम, फ्लॅस्टरचे कामाचा समावेश होता. या कामास १० नोव्हेंबर २०१७ पर्यंत मुदत होती. मात्र, ठेकेदाराच्या संथगती कामामुळे काम रेंगाळले आहे. महापालिका प्रशासनाने त्याच्यावर कारवाई न करता दोनदा मुदतवाढ दिली आहे. ही मुदत या महिना अखेरीस पूर्ण होत असतानाही प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी संबंधितांवर मेहेरबाणी करीत स्थायी समितीने पुन्हा वाढीव निधीला मंजुरी दिली आहे.  हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी साहित्यप्रेमींतून होत आहे. परंतु त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. 
..........
विद्युत अन् फ्लोरिंगसाठी २३ कोटी
नाट्यगृहाच्या उर्वरित कामासाठी गंगाणींनाच काम दिले आहे. फ्लोरिंग, सबस्टेशन रूम, पंप रूम, ध्वनिरोधक यंत्रणा, फॉल सिलिंग, रंग सफेदी, कॅट वॉक व इतर अनुषंगिक कामे होणार आहेत. त्याचा आराखडा कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी तयार केला आहे. त्यात १४ कोटींची स्थापत्यविषयक आणि आठ कोटींची विद्युतविषयक कामे असणार आहेत. 

अधिकाऱ्याचे ठेकेदारास पाठबळ 
नाट्यगृहाच्या कामासाठी अधिकाऱ्याचे पाठबळ असल्याचे दिसून येत आहे. ठेकेदारावर वचक ठेवण्याऐवजी प्रशासन ठेकेदाराची बाजू मांडण्यात धन्यता मानत आहे. कामास विलंब का? या प्रश्नावर ‘‘नोटाबंदी व पावसामुळे काम बंद होते. परिणामी, कारवाई करण्यात आली नाही, असे उत्तर अधिकारी देत आहेत.
........
नाट्यगृहाचे काम का रखडले. याची चौकशी केली जाईल. चुकीची गय केली जाणार नाही. यापुढील काम वेळेत पूर्ण कसे होईल. याबाबत स्थापत्य विभागाच्या अधिकाºयांकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे.  मुदतीत काम न केल्यास कायदेशीर कारवाई करू.’’-  विलास मडिगेरी, अध्यक्ष, स्थायी समिती
....
मुदतवाढीचा अट्टाहास कशासाठी 
४नाट्यगृहाचे पहिली निविदा ३७ कोटी २५ लाखांची होती. साडेचार वर्षांपासून काम संथगतीने सुरू आहे. याकडे प्राधिकरण परिसरातील नगरसेवकांचे दुर्लक्ष आहे. ठेकेदारावर कारवाई न करता त्याला मुदतवाढ देण्याचा अट्टाहस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा आहे. काम वेळेत न करणाºया ठेकेदारावर सत्ताधारी मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. एका प्रकल्पावर आजवर पाच अभियंते नियुक्त केले होते. मात्र, काम पूर्ण झालेले नाही. त्याच ठेकेदाराला २२ कोटी ८९ लाखाचे काम दिले आहे. त्यामुळे या नाट्यगृहाचा खर्च साठ कोटींवर जाणार आहे.या कामास १० नोव्हेंबर २०१७ पर्यंत मुदत होती. मात्र, ठेकेदाराच्या संथगती कामामुळे काम रेंगाळले आहे.
..........


 


Web Title: The project was incomplete after increased expenditure at the G.d.madgulakar Theater in Akurdi pradhikran
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.