शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शिकविण्याचा धंदा तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 02:43 IST

सध्या खासगी शिकवणी लावण्याची प्रथा शहरात वाढली आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी लावलेली असल्याचे वास्तव समोर येत आहे.

चिंचवड : सध्या खासगी शिकवणी लावण्याची प्रथा शहरात वाढली आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी लावलेली असल्याचे वास्तव समोर येत आहे. गल्लीबोळात सुरू झालेल्या या व्यवसायाचे बाजारीकरण झाले असून, या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. शिक्षण पद्धतीचे बाजारीकरण झाल्याने विद्यार्थ्यांची गळचेपी होत असून, पालक भरडले जात आहेत. यामुळे शालेय शिक्षण पद्धतीची घसरण होत असून, खासगी शिकवणीचा धंदा सध्या तेजीत आहे.पूर्वीच्या काळी शिकवणी ही चैन वाटत होती. केवळ श्रीमंतांचीच मुले शिकवणी लावत असत. मात्र साधारणपणे अवघड जाणाऱ्या विषयांना शिकवणी लावण्याची पद्धत होती. आता शिकवणीची पद्धत एवढी वाढली आहे की, पूर्वीच्या काळी कोणी शिकवणी न लावता शिकत होते असे म्हटले तर तरुण पिढीला आश्चर्य वाटते. सध्या शिकवणी शाळेइतकीच महत्त्वाची झाली आहे. पूर्वी गणित आणि इंग्रजी या विषयांची शिकवणी लावलेली असे. कारण इंग्रजी मुळातच अवघड वाटते आणि गणिताला सरावाची गरज असते. पण आता मराठी, हिंदी, भूगोल, विज्ञान याही विषयांना अगदी चौथीपासून शिकवणी लावलेली असते. पूर्वी शाळेच्या मुलांना शिकवण्या लावल्या जात, पण आता कॉलेजच्या मुुलांना सुद्धा शिकवण्या लावल्या जातात. पदवीधर झालेल्या मुलांनी नोकºया मागत फिरण्यापेक्षा शिकवणी वर्ग सुरू करून नोकरीपेक्षा अधिक कमाई सुरू केली आहे.त्यासाठी विशेष भांडवल लागत नसल्याने घरात अथवा एखाद्या छोट्याशा गाळ्यातही अशा प्रकारचे व्यवसाय थाटले जात आहेत. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक पंचवीस ते पन्नास हजारांपर्यंत फी आकारली जात असून, मराठी माध्यमासाठी बारा ते तीस हजारांपर्यंत फी घेतली जात आहे. शिक्षण पद्धती पालकांच्या लक्षात येत नाही.शाळेच्या व्यस्त दिनक्रमातून थोडा वेळ मिळताच मुलांना शिकवणीसाठी पाठविले जात असल्याने मुलांचे मैदानी खेळ बंद होत आहेत. काही नामांकित क्लास वर्षभर अगोदर मुलांची नावनोंदणी करून घेत आहेत. मुलांना येथे प्रवेश मिळावा यासाठी पालकही अशा ठिकाणी पैसे भरून प्रवेश निश्चित करत आहेत. दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी विद्यार्थी कोणत्या क्लासचे आहेत हे दर्शविण्यासाठी मोठमोठ्या जाहिराती केल्या जात आहेत. पालक अशा पद्धतीला भुलत असल्याने हे व्यावसायिक मनमानी पद्धतीने पैसे घेत आहेत. शालेय शिक्षणाची गुणवत्ता खालावत असल्याने खासगी शिकवणीचा व्यवसाय सध्या जोमात आहे. अशा व्यवसायावर काही निर्बंध लावण्याची गरज असल्याचे मत पालकांकडून व्यक्त होत आहे.खासगी शिकवणीत एका वेळी तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. दिवसभरात पाच ते सहा तास विविध इयत्तांच्या विद्यार्थ्यांचे क्लास घेतले जातात. विशिष्ट विषयाच्या शिक्षणासाठी वेगवेगळी फी घेतली जात आहे. यासाठी काही विशेष शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. काही शाळांतील शिक्षक वेगवेगळ्या भागात जाऊन शिकवणी घेत आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रeducationशैक्षणिकStudentविद्यार्थी