शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई; १७ जणांना तडीपारीचा तडाखा

By नारायण बडगुजर | Published: February 23, 2024 9:07 AM

लोकसभेची निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार - पोलीस आयुक्त

पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्याअंतर्गत वाकड, दिघी आणि पिंपरीमधील तीन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली. तर वाकड, महाळुंगे, चिखली, देहूरोड आणि पिंपरी परिसरातील १७ गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार केले. 

वाकड पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार संदेश ऊर्फ शिलव्या लाजरस चोपडे (रा. अमरदीप कॉलनी, काळेवाडी) याच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत. दिघी पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार अनिकेत ऊर्फ गुड्या संजय मेटकरे (रा. भारतमातानगर, दिघी) याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. पिंपरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार दीपक सुरेश मोहिते (रा. नेहरूनगर, पिंपरी) याच्यावर दहा गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्या अंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन, महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक, चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक, देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन आणि पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ११ गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले.

...यांना केले तडीपार

वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आनंद किशोर वाल्मिकी (२९, रा. काळा खडक, वाकड) याला दोन वर्षांसाठी तर आशिष एकनाथ शेटे (२४, रा. नखाते वस्ती, रहाटणी याला एक वर्षासाठी तडीपार केले. महाळुंगे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संकेत माणिक कोळेकर (२२, रा. धामणे, ता. खेड) याला एक वर्षासाठी तडीपार केले. चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आकाश बाबू नडविन मणी (२१, रा. मोरेवस्ती, चिखली) याला दोन वर्षांसाठी तडीपार केले. देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोहित उर्फ गबऱ्या राजस्वामी (२२, रा. एमबी कॅम्प, देहुरोड) याला एक वर्षासाठी तर ऋषिकेश उर्फ शऱ्या अडागळे (२४, रा गांधीनगर, देहूरोड) याला दोन वर्षांसाठी तडीपार केले. पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुरज रामहरक जैस्वाल (२१), शुभम राजू वाघमारे (२२, दोघेही रा. नेहरुनगर, पिंपरी),  वृषभ नंदू जाधव (२१), शेखर उर्फ बका बाबू बोटे (२०), शुभम अशोक चांदणे (१९), शांताराम मारुती विटकर (३४), अनुराग दत्ता दांगडे (१९, सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड), सागर ज्ञानदेव ढावरे (२०, रा. मिलींदनगर, पिंपरी), पंकज दिलीप पवार (३२, रा. चिंचवड), सोन्या उर्फ महेश श्वेणसिध्द कांबळे (२१, रा. दत्तनगर, चिंचवड), आनंद नामदेव दणाणे (३१, रा. विद्यानगर, चिंचवड) या सर्वांना दोन वर्षांसाठी तडीपार केले.    

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गुन्हेगारांवरील कारवाई सुरूच आहे. यंदा तीन गुन्हेगारी टोळ्यांमधील १९ जणांवर ‘मोका’ लावला. तीन गुन्हेगारांना स्थानबद्ध केले. तर १७ गुन्हेगारांना तडीपार केले. असे एकूण ३९ गुन्हेगारांवर कारवाई केली. लोकसभेची निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.  - वसंत परदेशी, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcommissionerआयुक्तSocialसामाजिक