पूर्ववैमनस्यातून भांडण; एकावर चॉपरने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 05:29 IST2018-01-17T05:29:33+5:302018-01-17T05:29:42+5:30

पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून सात जणांच्या टोळक्यांनी कोयता व चॉपरने एकावर वार करण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास खराळवाडी येथील भागवत गीता मंदिराजवळ घडली

Prejudice; Chopper Strike | पूर्ववैमनस्यातून भांडण; एकावर चॉपरने वार

पूर्ववैमनस्यातून भांडण; एकावर चॉपरने वार

पिंपरी : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून सात जणांच्या टोळक्यांनी कोयता व चॉपरने एकावर वार करण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास खराळवाडी येथील भागवत गीता मंदिराजवळ घडली. गणेश विलास शिंगाडे (रा़ खराळवाडी) असे जखमीचे नाव आहे. जखमी तरुणावर तडीपारीची कारवाई झाली आहे़ तो आजारी आईला भेटण्यास खराळवाडीत आला असता, त्याच्यावर हल्ला झाला.
पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी विठ्ठल मारुती बनपट्टे (वय ३५), कमलेश युवराज बनपट्टे (वय २४), गणेश राजू बनपट्टे (वय २६), जॉर्ज विल्यम फ्रान्सिस (वय ३५) तसेच अविनाश राजू चौगुले (वय २२, रा़ वडारवाडी, गोखलेनगर) या पाच जणांना अटक केली आहे. संजय बनपट्टे (वय ३५), राजू बनपट्टे (वय ४५) हे दोघे फरार आहेत. गणेश शिंगाडे (वय २८, रा. खराळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
दिनेश शिंगाडे याला पिंपरी हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. तो आपल्या आजारी आईला पाहण्यासाठी खराळवाडी येथील घरी आला होता. आईला भेटून दिनेश परत जात होता. त्या वेळी विठ्ठल बनपट्टे याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून दिनेश याच्यावर साथीदारांच्या मदतीने कोयता व चॉपरने वार केले.

Web Title: Prejudice; Chopper Strike

टॅग्स :Crimeगुन्हा