शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

एकदा नव्हे दोनदा चुकीचा स्पर्श’महिला पोलीस अधिकाऱ्याने सांगितला भाजप पदाधिकाऱ्याचा कारनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:56 IST

- ही घटना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घडली. दौऱ्याच्या व्यवस्थापनात कार्यरत असताना कोंढरे यांनी पाठीमागून संबंधित महिला अधिकाऱ्याला धक्का दिला होता.

पुणे -पुणे शहरात भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि सध्याचे शहराचे महासचिव प्रमोद विठ्ठल कोंढरे यांच्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याशी विनयभंग आणि गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४ आणि ७५(१) अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे राजकीय आणि पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पुणे शहर पोलीस दलातील एक महिला पोलीस निरीक्षक या प्रकरणाची फिर्यादी असून, त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, भाजप नेते प्रमोद कोंढरे यांनी एकदा नाही, तर दोन वेळा त्यांना अयोग्य आणि अश्लील पद्धतीने स्पर्श केला. या प्रकारामुळे त्यांना अत्यंत अपमानित वाटले. घटनेनंतर त्यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

ही घटना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घडली. दौऱ्याच्या व्यवस्थापनात कार्यरत असताना कोंढरे यांनी पाठीमागून संबंधित महिला अधिकाऱ्याला धक्का दिला होता. हा प्रकार चहाच्या दुकानाजवळ घडला आणि तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.

महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर हे प्रकरण थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तक्रारीसोबत सादर करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करण्यात आली. यानंतर पोलीस आयुक्तांनी प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी अधिकृत एफआयआर नोंदवली असून, सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याशी अशा प्रकारचे वर्तन हा केवळ महिलांचा अपमान नाही, तर पोलीस यंत्रणेचा आणि कायद्याचा अवमान आहे,” असे त्या म्हणाल्या.

या घटनेनंतर समाजात महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कायदा रक्षक महिलांवरच जर असे वर्तन होणार असेल, तर सामान्य महिलांची स्थिती काय असेल, असा संतप्त सवाल अनेकजण विचारत आहेत. गुन्हा स्पष्टपणे सिद्ध करणारे सीसीटीव्ही फुटेज हाती असल्याने आरोपीवर कठोर कारवाई होण्याची मागणी जोर धरत आहे. पोलीस प्रशासनाने प्रकरण पारदर्शकपणे हाताळण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी