शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जाती धर्माचे राजकारण केलं जातंय, ही बाब हानीकारक; सतेज पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 09:03 IST

भारत जोडो यात्रा ही लोकशाही वाचविण्यासाठी, महागाईला थांबविण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि युवकांच्या रोजगारसाठी

पिंपरी : जाती-धर्मांत तेढ निर्माण करण्याचे आणि जातीयवादाचे विष पेरण्याचे काम देशात सुरू आहे. महागाई, बेरोजगारीने कळस गाठला आहे. त्यामुळे सातवर्षात विघातक राजकारण सुरू आहे, देशाची घटना बदलण्याचे काम काही लोक करीत आहेत, अशी टीका माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पिंपरीत गुरूवारी केली.

पिंपरी-चिंचवड काँग्रेस समितीच्या वतीने भारत जोडो यात्रेबाबत प्रबोधन करण्यासाठी रथ तयार केले आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदार संघात प्रबोधन सुरू आहे. त्यानिमित्ताने खराळवाडीत झालेल्या कार्यक्रमास काँग्रेसचे नेते पाटील बोलत होते. 

सतेज पाटील म्हणाले, ‘‘भारत जोडो यात्रा ही लोकशाही वाचविण्यासाठी, महागाईला थांबविण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि युवकांच्या रोजगारसाठी केली आहे. धर्माच्या नावाने प्रश्न निर्माण करून त्यात तेल ओतण्याचे काम भाजपा करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली घटना बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महागाई बेरोजगारीने कळस गाठला असताना मूळ प्रश्नांपासून भरकटविण्याचे काम केले जात आहे.डाळ, तेलाचे, गॅसचे दर गगणाला भिडलेत. सामान्यांच्या डोक्यावर महागाई मारण्याचे काम केले आहे. सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असताना जातीयवाद वाढविण्याचे काम केले जात आहे. जाती धर्माचे राजकारण केले जात आहे, ही बाब हानीकारक आहे. बंधूभाव धोक्यात येत आहे. माणुसकीधर्म वाढविण्यासाठी भारत जोडो यात्रा आहे.’’

टॅग्स :PuneपुणेSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलPoliticsराजकारणInflationमहागाईcongressकाँग्रेसBJPभाजपा