शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचार्‍यानी दिली आई, बहिणीला गोळ्या घालण्‍याची धमकी; काळेवाडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:31 IST

पोलिस कर्मचारी आणि त्यांची बहीण यांच्यात आई-वडिलांच्या मिळकतीवरून वाद सुरू आहे.

पिंपरी : मिळकतीच्या वादातून पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:च्या आई व बहिणीला शिवीगाळ केली. त्या दोघींनाही गोळ्या घालण्याची धमकी दिली. मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल केला. काळेवाडी येथे शनिवारी (दि. २८) दुपारी पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली.काळेवाडी येथे राहणाऱ्या ५४ वर्षीय महिलेने याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी ५३ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेला पोलिस कर्मचारी हा फिर्यादी महिलेचा भाऊ आहे. पोलिस कर्मचारी आणि त्यांची बहीण यांच्यात आई-वडिलांच्या मिळकतीवरून वाद सुरू आहे.दरम्यान, शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पोलिस कर्मचारी पत्नी आणि मुलीसह फिर्यादी बहिणीच्या घरी आला. बहिणीसोबत आईदेखील होती. त्यावेळी भावाने आई आणि बहिणीला शिवीगाळ केली. पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी आणि मुलीनेही त्यांना शिवीगाळ केली. ‘मीपण पोलिस आहे, मी तिला गोळ्या घालतो, काय होईल ते होईल’, असे तो म्हणाला. त्यानंतर पत्नी आणि मुलीला तो म्हणाला की, तुम्ही दोघींनी बहीण आणि आईला मारहाण केली नाही तर मी फास लावून आत्महत्या करेन. फिर्यादी बहिणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयkalewadiकाळेवाडी