पोलीस महिलेच्या मुलाचा खून  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 03:09 IST2017-09-12T03:09:44+5:302017-09-12T03:09:57+5:30

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत चिंचवड येथील महाविद्यालयात शिकणाºया आदित्य सुमीत जैद (वय १८) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.

 Police murder woman's son | पोलीस महिलेच्या मुलाचा खून  

पोलीस महिलेच्या मुलाचा खून  

पिंपरी : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत चिंचवड येथील महाविद्यालयात शिकणाºया आदित्य सुमीत जैद (वय १८) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. जखमी आदित्यला भोसरी-मोशी रस्त्यावरील खासगी रुग्णालयात दाखल करून मारहाण करणारे विद्यार्थी पसार झाले.
चार जणांविरुद्ध चिंचवड पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आदित्य हा निगडी पोलीस ठाण्यात हवालदार पदावर सेवेत असलेल्या सुनीता जैद यांचा मुलगा आहे.
चिंचवड येथील महाविद्यालयात शिकणाºया आदित्यला काही तरुणांनी मोटारीत बसवून त्रिवेणीनगरला नेले. तेथे त्याला व त्याच्या मैत्रिणीला मारहाण केली. या मारहाणीत आदित्य जखमी झाला. गंभीर जखमी झाल्याने आदित्यला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करून आरोपी पसार झाले. उपचारादरम्यान आदित्यचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिलीप गायकवाड, अक्षय मोरे, धीरज थिटे, धीरज शिंदे या चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली. मुलीच्या प्रेमप्रकरणातून हा खुनाचा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आदित्यचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला.

Web Title:  Police murder woman's son