शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिसाचा विनयभंग; एका पोलिसाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 14:05 IST

आरोपीने शिवीगाळ करत एका वाहतूक पोलिसाला मारून जखमीही केले...

पिंपरी : संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्यासाठी वाहतूकीचे नियमन करताना नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीवरील दोघांना आडवले म्हणून त्यांनी महिला पोलीसाशी गैरवर्तन करत विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करत एका वाहतूक पोलिसाला मारून जखमी केले. ही घटना रविवारी (दि.२०) सायंकाळी साते ते साडेसातच्या दरम्यान देहुफाटा चौक, आळंदी येथे घडला. या प्रकरणी महिला पोलीस यांनी दिघी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.२१) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भुषण मनोज जैन (वय ३०, रा. घोलपवस्ती, आळंदी), दत्तात्रय रामा कोकरे (वय २६, रा.गोलेगाव, खेड) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पोलीस स्टाफसह संजीवन सोहळ्यानिमित्त वाहतूक नियमन करत होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीरून आरोपी देहुफाटा चौक येथून आळंदीकडे श्री संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता वाहतूकीस प्रतिबंधित केलेला असताना देखील त्या रस्त्याने दुचाकीवरून जात होते. फिर्यादी यांनी आरोपींना थांबवून दुचाकी पुढे देण्यास मनाई केली. त्यावेळी आरोपी भूषण याने आरडाओरडा करत फिर्यादी यांना ढकलून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच कर्तव्यावर असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपीने मोठमोठ्याने शिवीगाळ केली.

यात आरोपी दत्तात्रय याने भूषण याला साथ दिली. फिर्यादीच्या मदतीसाठी आलेल्या पोलीस कॉन्सटेबल गारोळे यांचा तोंडावर आरोपी भूषण याने फाईट मारून त्यांना जखमी केले. आरोपी पळून जात असताना तेथे असलेल्या जमावाने त्याला लाथ्थाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी जमावाच्या तावडीतून पळून जात असल्याने रस्त्याच्या बाजुला असेलेल्या पोलला धडकल्यामुळे किरकोळ जखमी झाला.

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस