शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी करणाऱ्या तरुणानं चक्क खाकी परिधान करून खंडणी मागितली; पोलिसांच्या तावडीत सापडताच गजाआड रवानगी झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 11:24 IST

गैरवापर करून तोतयेगिरी करणारा तरुण सांगवी पोलिसांच्या तावडीत सापडला असता त्याची गजाआड रवानगी झाली

ठळक मुद्देदुकानदाराकडे खंडणी मागताना त्यांची तोतयेगिरी उघड

पिंपरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा (एमपीएससी) अभ्यास करताना तरुणाच्या मनात पोलिसांची क्रेझ निर्माण झाली अन् त्याने चक्क ‘खाकी’ परिधान केली. त्याचा गैरवापर करून तोतयेगिरी केली. मात्र तो सांगवी पोलिसांच्या तावडीत सापडला आणि त्याची गजाआड रवानगी झाली.  

बुध्दभूषण अशोक कांबळे (वय २७, रा. म्हेत्रे वस्ती, निगडी, मूळ रा. अंबाजोगाई, जि. बीड), असे तोतया पोलिसाचे नाव आहे. त्याच्यासह औदुंबर भारत जाधव (वय २९, रा. कासारवाडी, मूळ रा. उस्मानाबाद) याला देखील सांगवी पोलिसांनी अटक केली. 

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुध्दभूषण हा पोलीस असल्याचे तर औदुंबर हा एसबीआय बँकेत मॅनेजर असल्याचे सांगत होता. पिंपळे गुरव येथे सृष्टी चौकात ३१ ऑगस्टला रात्री एका पान शॉपवाल्याकडे ते दोघे गेले. दुकान रात्री उशिरापर्यंत का चालू ठेवले, असे म्हणून त्यांनी हजार रुपयांची मागणी करून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. त्यावेळी तेथून जात असलेल्या पोलीस कर्मचारी प्रमोद गोडे व अरुण नरळे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. पोलिसांचा गणवेश घातलेली व्यक्ती दिसल्याने गोडे व नरळे त्यांच्याजवळ गेले. त्यांच्याकडे चौकशी केली. मी एसबीआय बँकेत मॅनेजर आहे,असं औदुंबरने सांगितले. मी मुंबई येथे क्राईम ब्रांचमध्ये पोलीस अधीक्षक या पदावर नेमणुकीस आहे, असं बुध्दभूषणने सांगितले. मात्र बुध्दभूषण यानं पोलीस उपनिरीक्षकाचा गणवेश परिधान केला होता. त्यामुळे आरोपींची तोतयेगिरी उघड झाली.  

क्रेझ अन् करिअर... बुध्दभूषण याने बीएसस्सीपर्यंतचे शिक्षण घेतले. एमपीएससी करून अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. अभ्यासादरम्यान पोलिसांबाबत ‘क्रेझ’ झाली. दरम्यान, त्याने एका पेट्रोलपंपावर क्रेडीट कार्ड वितरणाचे काम सुरू केले. त्यावेळी तेच काम करणारा औदुंबर याच्याशी त्याची ओळख झाली. औदुंबरककडे बँकेचा लागो असलेला गणवेश होता. गणवेशाचा गैरवापर करून त्यांनी तोतयेगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकMPSC examएमपीएससी परीक्षा