शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

उद्दिष्टपूर्ती होईपर्यंत पीएमआरडीएचे विलिनीकरण नाही : किरण गित्ते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 13:52 IST

पीएमआरडीएच्या विलिनीकरण चर्चेवर पडदा पडला आहे. 

ठळक मुद्देपीएमआरडीएचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू पीएमआरडीए क्षेत्रात १३ नगरनियोजनाचे आराखडे तयार केले जाणार शिक्षण, औद्योगिक असे क्लस्टरही निर्माण करण्यास प्राधान्य दिले जाणार एकात्मिक विकासासाठी पीएमआरडीए ही एकच संस्था असणे गरजेचे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ज्या उद्देशाने स्थापन झाले. उद्दिष्टपूर्ती होईपर्यंत प्राधिकरणाचे विलिनीकरण करण्यात येणार नाही. एकात्मिक विकासासाठी पीएमआरडीए ही एकच संस्था असणे गरजेचे आहे, असे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी येथे सांगितले. त्यामुळे पीएमआरडीच्या विलिनीकरण चर्चेवर पडदा पडला आहे. पीएमआरडीएची स्थापना झाल्यानंतर प्राधिकरणाचे विलिनीकरण होणार याबाबतचे सुतोवाच भाजपाच्या नेत्यांनी केले होते. त्यानंतर विलिनीकरणास विरोध झाला होता. पिंपरी-चिंचवड प्रेस क्लबने गित्ते यांच्याशी संवाद आयोजित केला होता.गित्ते म्हणाले, एका कार्यक्षेत्रात दोन प्राधिकरण असत नाही. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये प्राधिकरणाची स्थापना अनेक वर्षांपूर्वी झाली. विलिनीकरणाची चर्चा होती. प्राधिकरण ज्या उद्देशाने स्थापन झाले. नियोजित काम झाल्यानंतर पीसीएनटीडीएचे विलिनीकरण प्राधिकरणात करण्यास हरकत नाही. गित्ते म्हणाले, पीएमआरडीएचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. पीएमआरडीएचे मुख्यालय पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरणाच्या आकुर्डीतील कार्यालयात असणार आहे. येत्या २७ नोव्हेंबरला क्रॉप्रेसिव्ह ट्रॅफिक, ट्रान्सपोर्ट मोबीलीटी प्लानचे सादरीकरण करण्यात येणार आहे. एल एन टीच्या संशोधन टीमने तो तयार केला आहे. पीएमआरडीएच्या धर्तीवर हा आराखडा असणार आहे. त्याअंतर्गत वाहतूक नियोजन, आराखड्याचा समावेश असणार आहे. रिंग रोड, मेट्रो, मोनो रेल आदींचे नियोजन केले जाणार आहे. मेट्रोसाठी ताशी १८००० प्रवाशी तर बीआरटीसाठी आठ हजार प्रवाशांनी प्रतिताशी प्रवास करणे आवश्यक असतो. तेव्हा या सेवा देणे संबंधित संस्थांना शक्य होणार आहे.आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे सर्वेक्षणपुणे जिल्ह्यातील ७२५७ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश यात असणार आहे. पुणे ग्रामीण, शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नियोजनाचे काम सुरू आहे. पुढील पन्नास वर्षांची वाढ लक्षात घेता हा आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच डीपी आराखड्याचेही नियोजन केले जाणार आहे. सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या माध्यमातून याबाबतचा सर्वे आणि नियोजन केले जाणार आहे, तसेच पीएमआरडीए क्षेत्रात १३ नगरनियोजनाचे आराखडे तयार केले जाणार आहे. पाचशे एकर अशा एकुण तेरा प्रकल्प होणार आहेत, तसेच शिक्षण, औद्योगिक असे क्लस्टरही निर्माण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, असे गित्ते यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएKiran Gitteकिरण गित्ते