The plan of robbery on petrol pump was failed by the police; Five people were arrested | पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा डाव पोलिसांनी उधळला; पाच जणांना केली अटक 

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा डाव पोलिसांनी उधळला; पाच जणांना केली अटक 

पिंपरी : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा डाव उधळला आहे. वाकड पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. डांगे चाैक येथे रविवारी (दि. २४) दुपारी साडेतीनच्या सुमारास वाकड पोलिसांनी ही कारवाई केली.

तुषार आनंद भरोसे (वय २२), सिद्धार्थ आनंत भगत (वय २१), प्रेमशीतल जानराव (वय १९, तिघेही रा. पुणे), स्वप्नील नागनाथ चंदनशिवे (वय २२, रा. रहाटणी), श्रीपाद उर्फ ओंक्या मारुती कामत (वय १८, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

डांगे चौकातील शेल पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत काही जण थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पालघन, कुकरी, कोयता, रस्सी, टॉमी, मिरची पूड इत्यादी दरोड्याचे साहित्य मिळाले. सर्व आरोपी डांगे चौकातील शेल पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

Web Title: The plan of robbery on petrol pump was failed by the police; Five people were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.