पिंपरीत भरदिवसा महिलांची होतीये छेडछाड; शहरात एकाच दिवसांत ५ गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 04:12 PM2021-09-14T16:12:31+5:302021-09-14T16:12:56+5:30

महिला अत्याचार अन् विनयभंगाच्या प्रकारांत होतीये वाढ; महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

In Pimpri, women were molested all day long; 5 crimes in a single day in the city | पिंपरीत भरदिवसा महिलांची होतीये छेडछाड; शहरात एकाच दिवसांत ५ गुन्हे

पिंपरीत भरदिवसा महिलांची होतीये छेडछाड; शहरात एकाच दिवसांत ५ गुन्हे

Next
ठळक मुद्देआरोपीनं महिलांसोबत अश्लील वर्तन, शिवीगाळ, धमकी असे केले प्रकार

पिंपरी : महिला अत्याचार आणि विनयभंगाच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये विनयभंगाचे एकाच दिवसात पाच गुन्हे दाखल झाले. महिलांच्या छेडछाडीचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

अश्लील वर्तन करून दिली धमकी 

निगडी पोलीस ठाण्यात पिडीत महिलेने फिर्याद दिली. उमेश शेलार (वय ६०, रा. आकुर्डी), असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी या आकुर्डी येथे १७ जुलैला सकाळी सव्वादहाच्या सुमारास जीन्याची साफसफाई करत होत्या. त्या वेळी आरोपीने अश्लिल वर्तन केले. जर तुला येथे काम करायचे असेल तर माझ्या मर्जीप्रमाणे वागावे लागेल, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.  

बोलत नसल्याच्या कारणावरुन केला विनयभंग 
 
पीडित महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार सुलतान जाफर शेख (वय २९, रा. सादिक पेठ, फुलेनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तू माझ्याशी का बोलत नाही, असे म्हणून आरोपीने अश्लील वर्तन करून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. १२ ते १३ सप्टेंबर या कालवधीत हा प्रकार घडला.

महिलेचा पाठलाग करून बोलण्याचा प्रयत्न 

पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात उमेश पंडीत कुंभार (वय २०, रा. तळेगाव दाभाडे, वराळे रोड) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपी हा फिर्यादीचा पाठलाग करून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे. फिर्यादीने नकार दिला असता, आरोपीने शिवीगाळ करून दमदाटी केली. तळेगाव स्टेशन भाजी मार्केट येथे २०१९ ते १३ सप्टेंबर २०२१ या दरम्यान वारंवार हा प्रकार घडला.

गाडीला आडवी गाडी घालून अश्लिल भाषेत धमकी दिली 

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार हिंजवडी पोलीस ठाण्यात बहिणीसह भावावर गुन्हा दाखल झाला. गौरव रमेश यादव व त्याची बहिण (रा. शिंदेवस्ती मारूंजी), अशी आरोपींची नावे आहेत. गौरव याला पोलिसांनी अटक केली. आरोपी गौरव हा मोबाईलवरून फिर्यादी यांना घाणेरडे मेसेज पाठवत असे. तसेच गौरव याने फिर्यादी यांच्या गाडीला आडवी गाडी घालून अश्लिल भाषेत धमकी दिली. त्यानंतर आरोपीच्या बहिणीने फिर्यादीला मारहाण केली. मारूंजी रस्त्यावर सोमवारी (दि. १३) हा प्रकार घडला.

डिलीव्हरी बॉयने काढली छेड

पादचारी महिलेच्या जवळ येऊन स्विगी डिलीव्हरी बॉयने शेरेबाजी करत महिलेचा विनयभंग केला. सम्राट चौक, वाकड येथे रविवारी (दि. १२) हा प्रकार घडला. पीडित महिलेने या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title: In Pimpri, women were molested all day long; 5 crimes in a single day in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app