शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत वाहनचोऱ्यांचे सत्र सुरूच! चोरट्यांनी पळवल्या तीन दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 18:07 IST

घरासमोर अथवा सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेली वाहने गेली चोरीला

ठळक मुद्देनागरिकांनी वाहने पार्क करताना दक्षता बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन

पिंपरी: शहरात वाहन चोरीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. घरासमोर पार्क केलेली वाहने चोरीला जात आहेत. अशाच प्रकारे चोरट्यांनी शहरातून तीन दुचाकी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

नागरिक खरेदीसाठी बाहेर पडल्यावर सार्वजनिक ठिकाणी वाहने पार्क करतात. त्या एक दोन तासात वाहने पळवून लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. तर घरासमोरही पार्क केलेली वाहने चोरीला गेल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहने पार्क करताना दक्षता बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पहिल्या घटनेत मुक्तार अहमद सन्नाउल्ला खान (वय २७, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान यांनी त्यांची दुचाकी राहत्या घरासमोर शनिवारी रात्री नऊच्या सुमारास पार्क केली होती. ही दुचाकी रविवारी सकाळी सातच्या सुमारास चोरीस गेल्याचे दिसून आले. 

दुसऱ्या घटनेत पार्वती माणिक रहाटकर (वय ३०, रा. चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रहाटकर यांनी त्यांची दुचाकी टाटा मोटर्स कंपनीच्या मेन गेटसमोरील पार्किंगमध्ये ३० मार्च रोजी सकाळी सव्वासहाच्या सुमारास पार्क केली होती. दुपारी सव्वातीनच्या सुमारास दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले.

तिसऱ्या घटनेत सचिन शिवराम बोऱ्हाडे (वय ३८, रा.भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोऱ्हाडे यांनी २७ मार्चला रात्री आठच्या सुमारास आळंदी रोड, भोसरी येथील मंगलमूर्ती मेडिकल समोरील सार्वजनिक रस्त्यावर दुचाकी पार्क केली होती. त्यानंतर ते खरेदीसाठी गेले. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. बोऱ्हाडे खरेदी संपवून अर्ध्या तासानंतर परतले असता त्यांची दुचाकी चाेरीला गेल्याचे उघडकीस आले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकbikeबाईक