शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी गोळीबार प्रकरण : आणखी दोन आरोपींना बेड्या; आतापर्यंत सहा जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 23:52 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांनी बुधवारी (दि. १२) काळभोरनगर, चिंचवड येथे आपल्यावर गोळीबार झाल्याचा दावा केला होता.

पिंपरी : गोळीबार प्रकरणानंतर पिंपरी व निगडी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात निगडीतील दोन गुन्ह्यांमधील आणखी दोन आरोपींना मंगळवारी (दि. १८) बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यापूर्वी चार जणांना अटक केली आहे. साजिद मेहबूब शेख (वय २१, रा. मोरेवस्ती, चिखली) आणि रोहित अशोक कुसाळकर (वय २०, रा. रामनगर, चिंचवड), अशी मंगळवारी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रोहित उर्फ सोन्या गोरख भोसले (वय २०, रा. दळवीनगर, चिंचवड), सुलतान इम्तियाज कुरेशी (वय २०), रुतिक ऊर्फ भावड्या लक्ष्मण वाघमारे (वय २०, दोन्ही रा. आनंदनगर, चिंचवड), आतिष महादेव जगताप (वय २१) या आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांनी बुधवारी (दि. १२) काळभोरनगर, चिंचवड येथे आपल्यावर गोळीबार झाल्याचा दावा केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी आमदार समर्थकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार बनसोडे व कार्यकर्त्यांच्या दिशेने गोळीबार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. मात्र, याच्या परस्पर विरोधी तक्रार करण्यात आली. त्यात आमदारपुत्र सिद्धार्थ बनसोडे याच्यासह त्याच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे दाखल केले. 

आमदारपुत्राचा फोन ‘स्विच ऑफ’गोळीबार प्रकरणानंतर गुन्हे दाखल होऊन सहा ते सात दिवस झाल्यानंतरही त्यात आरोपी असलेला आमदारपुत्र सिद्धार्थ बनसोडे याला अटक करण्यात आलेली नाही. याबाबत पत्रकारांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना प्रश्न विचारला. आमदारपुत्राचा फोन स्विच ऑफ असून, गुन्ह्यात कोणाचीही हयगय करण्यात येणार नाही, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकFiringगोळीबारMLAआमदारNCPराष्ट्रवादी काँग्रेस