शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad: ‘पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, पुणे’ औद्योगिकनगरीच्या शैक्षणिक वैभवात भर पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 09:15 IST

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या प्रस्तावास मंत्रीमंडळाची मान्यता

पिंपरी : औद्योगिकनगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील शैक्षणिक वैभवात भर पडणार आहे.  पिंपरी-चिंचवड एज्यकेशन ट्रस्टच्या वतीने उभारलेल्या शैक्षणिक संकुलास ‘पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, पुणे’ असे स्वतंत्र विद्यापीठास मंगळवारी मुंबईत झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे.

पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी आहे. देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने शहरात दाखल झाले आहेत. नगरपालिका, महानगरपालिका असा विकास होताना शहरात स्वतंत्र असे विद्यापीठ नव्हते. पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शिक्षण संस्थांच्या वतीने चालविले जात होते. त्यानंतर गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी  डॉ. डी. वाय पाटील आणि मागील काही वर्षांत सिम्बायोसिस ही अभिमत विद्यापीठाच्या माध्यमातूनही पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जात असते.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या तीस लाखांवर पोहोचली आहे. तसेच मावळ, मुळशी आणि खेड तालुक्यांतून शिक्षणासाठी मुले पिंपरी-चिंचवडमध्ये येत असतात. तर शहरात प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये, वरीष्ठ महाविद्यालये, तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण देणाऱ्या अशा सुमारे साडेसातशे संस्था आहेत. बहुतांश संस्था क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून विविध संस्थांमध्ये पदवी आणि पदविका अभ्यासक्रम चालविले जातात.

शैक्षणिक वर्षांत विद्यापीठ सुरू होणार

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून वडगांव मावळ येथे शैक्षणिक संकुल उभारले आहे. स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठ मान्यतेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हा प्रस्ताव सादर केला होता. ट्रस्ट गेली ३० वषार्पासून शहरामध्ये शैक्षणिक सेवा देण्याचे कार्य करीत आहे. वडगांव मावळ येथे १० एकर जागेत हे विद्यापीठ उभारले आहे. सातेगाव येथे (ता.मावळ) हे विद्यापीठ आहे. मुंबईतील मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विषयांना मान्यता दिली. त्यात स्वयसाह्यता निधी अंतर्गत पिंपरी-चिंचवड विद्यापीठ पुणे यास मंत्री मंडळाने मान्यता दिली आहे. २०२३-२४ या शैक्षणिक आर्थिक वर्षांत विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकuniversityविद्यापीठEducationशिक्षणStudentविद्यार्थी