शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पवना नदी पुन्हा प्रदूषित; थेरगाव केजुदेवी बंधारा पुन्हा फेसाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 11:32 IST

- स्थानिक नागरिकांकडून संताप, रसायन मिश्रित सांडपाणी आणी जलपर्णीचा विळखा, कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

हिंजवडी : थेर गावातून खळखळून वाहणारी पवना नदी पुन्हा प्रदूषित झाली. नदी पात्रात रसायन मिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने संपूर्ण नदीपात्रच फेसाळले आहे. वारंवार येथील नदीपात्र फेसाळत असल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.प्रदूषित होणाऱ्या नदी पात्राबाबत ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. शुक्रवारी (दि. २१) केजुदेवी धरण परिसरात पवना नदी पात्र पूर्ण फेसाळले होते. नदीची झालेली दुरवस्था आणी पसरलेल्या दुर्गंधीचा सामना नागरिकांना सहन करावा लागत असल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, मागील अनेक महिने केजुदेवी धरण परिसरात पवना नदीला रसायन मिश्रित सांडपाणी आणी जलपर्णीचा विळखा पडला होता. त्यामुळे, नदीची अक्षरशः गटारगंगा झाल्याने परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.सध्या पवना नदी जलपर्णी मुक्त झाली मात्र, धरण परिसरात वारंवार रसायनमिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने संपूर्ण नदीपात्र फेसाळत आहे. त्यामुळे, जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, मानवी आरोग्यासह पर्यावरणाचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केजुदेवी धरण परिसरात पवना नदी वारंवार का प्रदूषित होत आहे? याची सखोल चौकशी करून, कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रriverनदी