शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तळ्यात-मळ्यात न करता ठाम राहा..! अजित पवारांनी कोणाचे कान टोचले ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:55 IST

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा नागरी सत्कार; एकाच ठिकाणी राहिलात तर पद देण्याचे स्पष्टीकरण 

पिंपरी : तळ्यात-मळ्यात अशी भूमिका घेऊ नका. एकाच मतावर ठाम राहा. एकाच ठिकाणी राहिलात तर तुम्हाला अण्णा बनसोडे यांच्यासारखे पद मिळेल. तळ्यात-मळ्यात भूमिका नेहमी घेत राहिलात तर कोणीच विचारात घेत नाही आणि पदही देत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी भूमिका न घेणाऱ्या नेत्यांना लगावला.विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार अण्णा बनसोडे यांचा काळेवाडी येथे जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर मंगला कदम, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक संदीप वाघेरे आदी उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.

अण्णा, सकाळी लवकर कामाला लागा!अजित पवार सत्कार सोहळ्यात अण्णा बनसोडे यांचे कान टोचत म्हणाले, “अण्णा म्हणजे मूर्ती लहान, पण कीर्ती महान; पण अण्णा, आता जुन्या सवयी सोडा, सकाळी लवकर कामाला लागा. लोकांना वेळ द्या. तुमच्यासोबत तुमच्या सगळ्या कुटुंबाकडे आता सगळ्यांचे बारीक लक्ष राहणार आहे. मी माझ्या चिरंजीवालाही सांगतो. जेवढे महत्त्वाचे पद, तेवढे जास्त कष्ट घ्यावे लागतात. सर्वांना न्याय देण्यासाठी काम करा. कोणताही शिक्का बसवून घ्यायचा नाही.”रस्ते छोटे करून चालणार नाही...

अजित पवार म्हणाले की, शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी जमीनमालकांना जास्त दर देऊन जमिनींची खरेदी केली जात आहे. अर्बन स्ट्रीटमधून रस्ते छोटे करून चालणार नाही. मात्र, रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन बसस्थानक, रेल्वेस्टेशनच्या परिसरात जादा एफएसआय देत आहे. इलेक्ट्रिक वाहनांनाही प्रोत्साहन देत आहे. शहरातील नदी सुधार आणि रस्ते विकासात काही चुका प्रशासनाकडून होत असतील तर त्या सुधारल्या जातील. पोलिसांनाही कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अजितदादांमुळे वारंवार काम करण्याची संधी : अण्णा बनसोडेनागरी सत्काराला उत्तर देताना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की, राजकीय क्षेत्रात काम करताना कोणाचा तरी वरदहस्त असावा लागतो. अजितदादांचा वरदहस्त मला लाभला. त्यांनी मला काम करण्याची वारंवार संधी दिली. माझ्या कामाची पावती त्यातून दिली. शहरात सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करीत राहिलो. संघर्ष करीत पुढे आलेल्या कार्यकर्त्याला मानाचे पद महायुतीच्या माध्यमातून मिळाले. त्याचा शहरासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी उपयोग करणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुती